Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group: अदानी समूह 13,000 नोकऱ्या देणार, कंपनीने बनवला नवा प्लॅन

Adani Group News: अदानी समूह आपला व्यवसाय वाढवण्यासाठी झपाट्याने काम करत आहे.

Manish Jadhav

Adani Group News: अदानी समूह आपला व्यवसाय वाढवण्यासाठी झपाट्याने काम करत आहे. आता बातम्या येत आहेत की, 2027 पर्यंत अदानी समूह आणखी एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट (Solar Manufacturing Project) उभारणार आहे.

यावेळी अदानी समूह 10 गिगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे सुमारे 13,000 नोकऱ्याही निर्माण होणार आहेत.

दरम्यान, अदानी समूह ऊर्जा संक्रमणावर म्हणजेच हरित ऊर्जा व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे. 2027 पर्यंत 10 GW चा मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट उभारणार आहे.

कंपनीशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अदानी समूहाची (Adani Group) सध्याची सौरऊर्जा उत्पादन क्षमता चार गिगावॅट (एक गिगावॅट बरोबरी 1,000 मेगावॅट) आहे.

15 महिन्यांत प्रचंड ऑर्डर्स मिळाल्या

अदानी सोलर या समूहाच्या सौर ऊर्जा उत्पादन युनिटशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, कंपनीला पुढील 15 महिन्यांत 3,000 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या निर्यात ऑर्डर मिळाल्या आहेत. अलीकडेच कंपनीने बार्कलेज आणि ड्यूश बँकेकडून $394 दशलक्ष मिळवले आहेत.

2015 मध्ये स्थापना केली

सौरऊर्जा निर्मितीसाठी वापरल्या जाणार्‍या सौर पॅनेलच्या निर्मिती करण्यासाठी 2015 मध्ये अदानी सोलरची स्थापन करण्यात आली. कपंनीने पुढील वर्षी उत्पादनास सुरुवात केली आणि सहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत तिची क्षमता तिप्पट होऊन चार गिगावॅट झाली.

13,000 नोकऱ्या निर्माण होतील

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी सोलर सध्या गुजरातमधील मुंद्रा येथे 10 GW क्षमतेचे पहिले पूर्णतः एकात्मिक आणि सर्वसमावेशक सौर उत्पादन युनिटची स्थापना करत आहे. हे समूहाचे सर्वात मोठे उत्पादन युनिट असेल आणि त्यातून 13,000 नोकऱ्या निर्माण होतील.

कंपनी ही योजना बनवत आहे

कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, अदानी सोलर सौर उत्पादन क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा (Technology) अवलंब करण्यात आघाडीवर आहे आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनही राबवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT