Gautam Adani
Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group: अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का, एकाच दिवसात आल्या दोन बातम्या

दैनिक गोमन्तक

Adani Wilmar Ltd Profit: अदानी समूहाने एकाच दिवसात गुंतवणूकदारांना दोन बातम्या दिल्या आहेत. यातील एक बातमी गुंतवणूकदारांसाठी वाईट तर दुसरी गुंतवणूकदारांसाठी चांगली आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मारच्या नफ्यात कमालीची घट झाली आहे.

दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेसचा नफा दुपटीने वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत त्याचा निव्वळ नफा 73 टक्क्यांनी घसरुन 49 कोटी रुपयांवर आल्याचे अदानी विल्मरने सांगितले. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 182 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

वाढती महागाई आणि व्याजदर यांचा परिणाम

एका वर्षाच्या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 5 टक्क्यांनी वाढून 14,209 कोटी रुपये झाले, जे मागील वर्षी याच कालावधीत 13,584 कोटी रुपये होते. कंपनीने म्हटले की, 'सप्टेंबरच्या तिमाहीत खाद्यतेल क्षेत्राला वाढती महागाई (Inflation), वाढलेले व्याजदर (Interest Rate), विलंबित मान्सून आणि मंदावलेली ग्रामीण मागणी यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागला.' अदानी विल्मारचे एमडी आणि सीईओ अंगशु मलिक म्हणाले की, “आम्ही आव्हानात्मक वातावरणात 9 टक्के व्हॉल्यूम वाढीसह मजबूत तिमाही वितरित केली आहे. या तिमाहीत खाद्यतेलाच्या व्यवसायात अनेक अडथळे आले.''

दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा दुपटीहून अधिक झाला

दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेसचा निव्वळ नफा दुसऱ्या तिमाहीत दुपटीहून अधिक झाला आहे. अदानी एंटरप्रायझेसने सांगितले की, 'चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आमचा निव्वळ नफा दुपटीने वाढला. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) ने दुसऱ्या तिमाहीत 460.94 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा 212.41 कोटी रुपये होता.'

कंपनीने पुढे सांगितले की, 'या कालावधीत कंपनीचे उत्पन्न जवळपास तिप्पट होऊन 38,175.23 कोटी रुपये झाले. जुलै-सप्टेंबर 2021 मध्ये हा आकडा 13,218 कोटी रुपये होता. एकात्मिक संसाधन व्यवस्थापन आणि विमानतळ (Airport) व्यवसायाच्या भक्कम कामगिरीमुळे निव्वळ नफ्यात वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT