bhimraj sharma jaipur Dainik Gomantak
अर्थविश्व

Business News: शेणाचं सोनं! जयपूरचा उद्योजक शेणाच्या उत्पादनांमधून कमावतोय करोडो रुपये

शर्मा गाईच्या शेणापासून गोकृती नावाने कागद बनवतात. तसेच, विविध प्रकारच्या स्टेशनरी वस्तू देखील बनवतात.

गोमन्तक डिजिटल टीम

पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरणपूरक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी जयपूरचा एक व्यक्ती अनोखे काम करत आहे. फक्त काम नव्हे तर त्यातून करोडो रूपये देखील कमवत आहेत. भीमराज शर्मा गाईच्या शेणापासून तब्बल 70 प्रकारच्या विविध पर्यावरणपूरक वस्तू तयार करतात. भीमराज शर्मा यांनी 2017 मध्ये शेणापासून उत्पादने बनवण्यास सुरुवात केली आणि त्याचे त्यांना पेटंट मिळाले. शर्मा गाईच्या शेणापासून गोकृती नावाने कागद बनवतात. तसेच, विविध प्रकारच्या स्टेशनरी वस्तू देखील बनवतात.

सणाच्या पार्श्वभूमीवर भीमराज शर्मा यांनी शेणापासून बनवलेल्या देवदेवतांच्या मूर्ती आणि अनेक विविध वस्तूंची चांगली विक्री होते. सणासुदीच्या काळात उत्पादनांना इतकी मागणी असते की, ती पूर्ण करणे शक्य होत नाही. असे भीमराज शर्मा म्हणाले. कोरोना संकटानंतर गौरीकृतीच्या कामावर परिणाम झाला, मात्र आताही शर्मा एक कोटींची उलाढाल करत आहेत आणि एका वर्षात 40 लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. 100 हून अधिक महिलांना गोकृतीच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे, तर 20-25 जणांची टीम थेट शर्मा यांच्यासोबत काम करत आहे.

"दक्षिण आफ्रिकेत हत्तीच्या शेणापासून काही उत्पादने आणि कागद बनवले जात असल्याचे ऐकले होते. यानंतर शेणापासून काही पदार्थ बनवण्याचा विचार केला. गायीचे वय 15 वर्षे असते, ज्यामध्ये ती फक्त 5 वर्षे दूध देते. उर्वरित 10 वर्षे ती शेण आणि गोमूत्र देते." असे भीमराज शर्मा म्हणाले.

भीमराज शर्मा यांनी ताजे शेण खरेदी करून, ते यंत्राच्या साहाय्याने मिसळून कपड्यांचे बारीक तुकडे केले. तुकडे चांगले मिसळून त्याचा कागद तयार केला जातो. कागद रंगीबेरंगी करण्यासाठी हळद आणि सेंद्रिय उत्पादने वापरली जातात. भीमराज शर्मा यांच्या या पेपरला लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनकडूनही मागणी आहे. शर्मा शेणाच्या कागदापासून ग्रीटिंग कार्ड्स, स्टेशनरी, फाइल्स, बुक कव्हर यांसारखी उत्पादने तयार करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT