A Bill to Levy 28 Percent GST on Online Gaming, Casino, Horse Riding has been Passed in the Lok Sabha Dainik Gomantak
अर्थविश्व

GST On Online Gaming: ऑनलाइन गेमिंग, कॅसिनोवर आता २८% जीएसटी; लोकसभेत विधेयक मंजूर

Ashutosh Masgaunde

A Bill to Levy 28 Percent GST on Online Gaming, Casino, Horse Riding has been Passed in the Lok Sabha:

ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो, घोडेस्वारीवर २८ टक्के जीएसटी लावण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले आहे. चर्चेनंतर हे विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आले.

यासोबतच 'केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2023' आणि 'एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2023' मंजूर करण्यात आले.

संसदेत कोणतीही चर्चा न होता विधेयक मंजूर करण्यात आले. शुक्रवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी दोन जीएसटी विधेयके लोकसभेत मांडली.

या विधेयकात ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेस क्लबवर २८ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव होता, त्याला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे.

या विधेयकाद्वारे, ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंग क्लबमध्ये बेटांच्या रकमेवर 28 टक्के जीएसटी लावण्यात आला.

CGST आणि IGST कायद्यांमध्ये दुरुस्ती केल्यानंतर, राज्यांना राज्य GST कायद्यातील तत्सम सुधारणांसाठी संबंधित विधानसभेची मंजुरी घ्यावी लागेल.

नोंदणी आणि कर भरणा तरतुदींचे पालन ने केल्यास परदेशातील ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर भारतात व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात येई.

केंद्रीय जीएसटी आणि एकात्मिक जीएसटी कायद्यातील या सुधारणांना जीएसटी परिषदेने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली.

कौन्सिलने ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगमधील एंट्री लेव्हल बेट्सच्या पूर्ण दर्शनी मूल्यावर 28 टक्के जीएसटी आकारण्यास मान्यता दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT