IPO|Share Market Dainik Gomantak
अर्थविश्व

IPO: बंपर कमाईसाठी तयार व्हा! 10 कंपन्याचे आयपीओ करतील गुंतवणूकदारांना मालामाल

Share Market: IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ऑगस्ट महिना फलदायी असणार आहे. या महिन्यात 8 ते 10 कंपन्या त्यांचे IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

Ashutosh Masgaunde

8 to 10 Companies Are Preparing to Launch their IPOs in August:

जर तुम्हाला IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या महिन्यात 8 ते 10 कंपन्यांचे IPO लॉन्च होण्याच्या तयारी सुरू आहे.

IPO मध्ये गुंतवणूक करून तुम्ही बंपर कमाई करू शकता. इन्व्हेस्टमेंट बँकर्सच्या म्हणण्यानुसार, जुलैमध्ये चार छोट्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग्ज (IPOs) च्या जोरदार मागणीनंतर, 8-10 कंपन्या IPO मधून ऑगस्टमध्ये सुमारे ₹8,000 कोटी रुपये भांडवल (Capital) उभारण्यासाठी रांगेत आहेत.

व्याजदर आणि चलनवाढीबद्दलची अनिश्चितता कमी झाल्याने मजबूत बाजारासह गेल्या दोन-तीन महिन्यांत IPO मागणी पुन्हा वाढली आहे. 2023 मध्ये आतापर्यंत 13 कंपन्यांनी बाजारातून 10,283 कोटी रुपये उभारले आहेत, तर 2022 मध्ये 40 कंपन्यांनी ₹59,302 कोटी उभारले आहेत.
अजय सराफ, ICICI सिक्युरिटीजचे इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे प्रमुख

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये ज्युपिटर लाइफलाइन हॉस्पिटल्स, टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स, बालाजी स्पेशॅलिटी केमिकल्स, यात्रा ऑनलाइन, इनोव्हा कॅप्टाब, एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज, ऋषभ इन्स्ट्रुमेंट्स आणि विष्णू प्रकाश आर पुंगलिया यांसारख्या कंपन्या त्यांचा पहिला IPO लॉन्च करू शकतात.

अहमदाबादस्थित फार्मास्युटिकल फर्म कॉनकॉर्ड बायोटेकचा ₹१,५५१ कोटींचा आयपीओ शुक्रवारी सबस्क्रिप्शनसाठी आला. दुसरीकडे, मुंबईस्थित नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी SBFC फायनान्सचा ₹ 1,025 कोटींचा IPO बुधवारी आला होता.

ऑगस्टमध्ये येऊ शकतात या कंपन्यांचे आयपीओ

ज्युपिटर लाइफलाइन हॉस्पिटल्स (Jupiter Lifeline Hospitals), इनोव्हा कॅप्टाब, TVS सप्लाय चेन सोल्युशन्स(TVS Supply Chain Solutions), यात्रा (Yatra), बालाजी स्पेशालिटी केमिकल्स(Balaji Specialty Chemicals), ऋषभ इन्स्ट्रुमेंट्स आणि एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे IPO ऑगस्ट महिन्यात लॉन्च केले जाऊ शकतात.

आयपीओसाठी अर्ज करताना रिटेल गुंतवणूकदारांनी त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट ठेवावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ते कंपनीच्या लिंस्टींगमधून कमाई करू पाहत आहेत की दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून आयपीओमध्ये उतरत आहेत.

जर ते दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून येत असतील तर त्यांनी ऑफर दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावे, कंपनीचा व्यवसाय आणि आर्थिक कामगिरी समजून घ्यावी.

या वेळी गुंतवणूकदार, प्रवर्तक आणि कंपन्या सावध आहेत कारण 2021 मध्ये अनेक मोठ्या IPO ने निराश केले आहे.

LIC च्या शेअरची किंमत जी IPO च्या वेळी 949 रुपये होती ती अजूनही 644.40 रुपयांवर अडकली आहे.

म्हणजेच, इश्यू किंमतीपेक्षा 32% कमी. अशा स्थितीत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा प्रवर्तक आणि कंपन्यांना आयपीओद्वारे पैसा उभा करायचा असतो. परंतु अनेक वेळा त्यांच्याकडे गुंतवणूकदारांसाठी काहीच नसते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीने पुढे जावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT