Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, DA वाढीस मंजूरी; खात्यात येणार एवढी मोठी रक्कम!

7th Pay Commission DA Hike: दिवाळीपूर्वी एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission DA Hike: दिवाळीपूर्वी एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. महागाई भत्ता वाढीसाठी अनेक महिन्यांपासून सुरु असलेली प्रतीक्षा आता संपली आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए आणि डीआरमध्ये 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

1 जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांना वाढीव DA चा लाभ मिळेल. सध्या सरकारकडून (Government) कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून तो आता 46 टक्के होणार आहे.

48 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला

ऑक्टोबरच्या वाढीव पगाराबरोबरच कर्मचाऱ्यांना (Employees) तीन महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरे तर, यावेळी 3 टक्के डीए वाढीचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

यानंतर कर्मचारी संघटनेने डीएमध्ये 4 टक्के वाढ करण्याची मागणी केली होती. 48 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना या वाढीचा फायदा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सरकार पत्रकार परिषदेत यासंदर्भातील घोषणा करणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

17000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे

दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रीच्या काळात दसऱ्यापूर्वी मंत्रिमंडळाने डीए वाढीला मंजुरी देऊन ऑक्टोबरच्या पगारात वाढीव रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. डीए आणि डीआर दरवाढीमुळे सरकारी तिजोरीवर सुमारे 17 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

यावेळी पगारामधील डीएच्या थकबाकीशिवाय कर्मचाऱ्यांना तदर्थ बोनसही दिला जाणार आहे. याशिवाय, रेल्वे कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनसही दिला जाणार आहे. अशा परिस्थितीत यावेळी पगारासह चांगली रक्कम येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

SCROLL FOR NEXT