Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, DA थकबाकीची तारीख झाली निश्चित !

7th Pay Commission latest news: 18 महिन्यांपासून रखडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीवर यावेळी चर्चा होणार असून कॅबिनेट सचिवांशी चर्चेची वेळही निश्चित करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission latest news: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या खात्यात पुन्हा एकदा मोठी रक्कम येणार आहे. 18 महिन्यांच्या डीए थकबाकीबाबत सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते. 18 महिन्यांपासून रखडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीवर यावेळी चर्चा होणार असून कॅबिनेट सचिवांशी चर्चेची वेळही निश्चित करण्यात आली आहे. यावेळच्या सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पूर्ण आशा आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम येणार

वास्तविक, केंद्रीय कर्मचारी त्यांच्या 18 महिन्यांच्या डीएच्या थकबाकीबद्दल सातत्याने मागणी करत आहेत, मात्र सरकारने (Government) अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

पेमेंट किती असेल माहित आहे?

कर्मचाऱ्यांच्या खात्यात किती पैसे येणार? नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएम (स्टाफ साइड) च्या शिव गोपाल मिश्रा यांच्या मते, वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडे वेगवेगळी एरियर आहे. लेव्हल-1 कर्मचार्‍यांची DA थकबाकी रु. 11,880 ते रु. 37,554 पर्यंत आहे, तर लेव्हल-13 (7वी CPC बेसिक पे-स्केल रु 1,23,100 ते रु. 2,15,900 किंवा लेव्हल-14 (पे-स्केल) ची गणना केल्यास कर्मचाऱ्याच्या हातात डीएची थकबाकी रु. 1,44,200 ते रु. 2,18,200 इतकी येईल.

18 महिन्यांच्या थकबाकीची अपेक्षा

कोरोना कालावधीनंतर केंद्र सरकारने 1 जुलै 2020 पासून महागाई भत्त्यात थेट 11 टक्क्यांनी वाढ केली होती, मात्र त्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही. म्हणजेच, कर्मचाऱ्यांना त्यांची थकबाकी मिळाली नाही. या विषयावर गेल्या वर्षी अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते की, फ्रीझ महागाई (Inflation) भत्त्याच्या बदल्यात थकबाकी दिली जाणार नाही.

दुसरीकडे, कर्मचारी संघटनांच्या मागण्यांमुळे सरकारवर सातत्याने दबाव वाढत आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. आता वाढती महागाई पाहता सरकार याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते, अशी आशा पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना सरकारकडून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: गोव्‍यात काम देण्‍याच्‍या बहाण्‍याने युवतींची फसवणूक! महाराष्‍ट्रातील मुलीही विळख्‍यात; नेपाळ, केनिया, युगांडाच्‍या तरुणींना आमिष

Panaji: पणजीला जुगार, ड्रग्ज, वेश्याव्यवसायाचा विळखा! LOP युरींनी वाचला सरकारच्या अपयशाचा पाढा

Goa Theft: रात्री दुकान फोडून घुसले चोरटे, हाती लागली फक्त चिल्लर, कोल्ड्रिंक पिऊन पळाले; पेडण्यात चोरांची झाली फजिती

Goa Tourism: 350 कोटींचे नवे प्रकल्‍प, पर्यटक वाढ; रशियातून विमान; पर्यटनमंत्री खंवटेंनी मांडला लेखाजोखा

Rashi Bhavishya 30 July 2025: प्रवासाची शक्यता,आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या; फसवणुकीपासून सावध राहा

SCROLL FOR NEXT