7th Pay Commission DA Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: आता 'या' राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिली मोठी भेट, डीएमध्ये केली इतकी टक्के वाढ!

7th Pay Commission Latest Update: मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission Latest Update: केंद्र सरकारने नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे.

याअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जाहीर करण्यात आली आहे. आता हिमाचल प्रदेश सरकारनेही राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि महिलांना मोठी भेट दिली आहे.

हिमाचल दिनानिमित्त सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीएमध्ये 3 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे.

आता, या राज्यातील कर्मचारी (Employees) आणि पेन्शनधारकांना 34 टक्के डीए मिळेल, जो पूर्वी 31 टक्के होता. या निर्णयाचा फायदा सुमारे 2.15 लाख कर्मचारी आणि 1.90 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात हिमाचल सरकारने म्हटले आहे की, या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 500 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

दरम्यान, सीएम सुक्खू यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाचे पालन करत, दुसऱ्या टप्प्यात जून 2023 पासून स्पितीतील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व 9,000 महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता देण्याची घोषणा केली.

दुसरीकडे, केंद्र आणि काही राज्य सरकारांनी महागाई भत्ता वाढवल्यानंतर हिमाचल प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 4 टक्के महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्क्यांवरुन 42 टक्के झाला आहे. ज्याचा लाभ 47.58 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना (Pensioners) मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT