Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: 'या' राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट, नवीन वर्षात मिळणार वाढीव पगार!

7th Pay Commission Latest News: मुख्यमंत्री भगवंत मान सरकारने नवीन वर्षापासून राज्य सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनश्रेणीनुसार वेतन देण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission In Punjab: नवीन वर्ष सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. पण त्याआधी पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने (Punjab AAP Government) सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या भेटवस्तू दिल्या आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान सरकारने नवीन वर्षापासून राज्य सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनश्रेणीनुसार वेतन देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या कार्यक्षेत्रात विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

वेतनश्रेणी 2 हप्त्यांमध्ये दिली जाईल

मान सरकारमधील उच्च शिक्षण मंत्री गुरमीत सिंह मीत हरे यांनी सांगितले की, सीएम भगवंत मान यांनी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना (Employees) 7 व्या वेतन आयोगाचा लाभ देण्याची घोषणा केली होती. आता हीच थकबाकी 2 हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच, पंजाबमधील (Punjab) सरकारी महाविद्यालयांमध्ये कार्यरत नियमित टीचर, गेस्ट टीचर, कंत्राटी पद्धतीने काम करणारे टीचर, गेस्ट प्राध्यापक आणि अर्धवेळ प्राध्यापकांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यासोबतच त्यांच्याबरोबर कार्यरत असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही ही थकबाकी दिली जाणार आहे.

गुरमीत सिंग मीत हरे पुढे म्हणाले की, 'भगवंत मान सरकारने शिक्षकांची गेल्या 6 वर्षांपासूनची मागणी पूर्ण केली आहे. या घोषणेमुळे सरकारी तिजोरीवर 280 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे, मात्र ही रक्कम शिक्षकांच्या आनंदापुढे काही नाही. ही तूट सरकार इतर स्रोतांमधून भरुन काढण्यात येणार आहे.'

पंजाबी भाषेबाबत मोठी घोषणा

दुसरीकडे, सीएम भगवंत मान यांनी अमृतसरमध्ये एका सरकारी कार्यक्रमात सहभागी होऊन पंजाबी भाषेच्या संवर्धनाबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, '21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. हा दिवस यायला अजून 2 महिने बाकी आहेत. तोपर्यंत सर्व फलक पंजाबी भाषेत प्राधान्याने करावेत. असे करण्यात अयशस्वी झाल्यास 21 फेब्रुवारीनंतर त्यांच्यावर दंड आकारला जाईल, ज्यासाठी लोक स्वत: जबाबदार असतील.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT