Money
Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, अर्थसंकल्पानंतर याची होणार घोषणा

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission Fitment Factor: नवीन वर्ष सुरु झाले असून, हे वर्ष आपल्यासाठी सुख-समृद्धी घेऊन येईल, अशी सर्वांना आशा आहे. होय, नवीन वर्षासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीही एक मोठी अपडेट येणार आहे. या अपडेट अंतर्गत 52 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ होणार आहे.

यापूर्वी, 2022 च्या अखेरीस, सरकारने फिटमेंट फॅक्टरवर निर्णय घेणे अपेक्षित होते. पण काही कारणास्तव तो निर्णय पुढे ढकलला गेला, आता नवीन वर्षात याबाबत निर्णय होऊ शकतो. फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याची सरकारची मागणी लवकरच मान्य होऊ शकते.

याबाबत अनेक बैठका झाल्या

दुसरीकडे, फिटमेंट फॅक्टर बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्यावर, यासंदर्भात अनेक बैठका झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. बातम्यांनुसार, सरकार 2024 पूर्वी याची अंमलबजावणी करण्याचा विचार करत आहे. अर्थसंकल्पानंतर (Budget) मार्च 2023 मध्ये याची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली जाऊ शकते. सरकारच्या बाजूने याची अंमलबजावणी झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.

पगारात फिटमेंट फॅक्टरची महत्त्वाची भूमिका

सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारात फिटमेंट फॅक्टरची भूमिका महत्त्वाची असते. यातील बदलांचा परिणाम संपूर्ण पगारावर होतो. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टरनुसार पगार मिळतो. तो वाढवून 3.68 टक्के करण्याची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच दिवसांपासून होत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्चमध्ये 38 टक्क्यांवरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

तसेच, सध्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपये आहे. फिटमेंट फॅक्टरवरील निर्णयानंतर ते 26,000 रुपये होईल. मात्र, याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टरनुसार, आता रु. 18000 च्या मूळ पगारात इतर भत्ते जोडून, ​तुम्हाला रु. 18,000 X 2.57 = रु. 46260 मिळतात. पण जर ते 3.68 टक्के वाढले तर कर्मचाऱ्यांना इतर भत्ते जोडून पगार 26000 X 3.68 = 95680 रुपये होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT