Budget 2023  Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, अर्थमंत्री करणार अर्थसंकल्पात 'ही' मोठी घोषणा!

7th Pay Commission: 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी 15 दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission: 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी 15 दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. अर्थसंकल्पाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशा अर्थसंकल्पाबाबत लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. (Budget 2023)

लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असल्याने सामान्य माणसापासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी सरकार यावेळी नक्कीच काहीतरी मोठी घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही अर्थसंकल्पातून दिलासा मिळू शकतो.

फिटमेंट फॅक्टरची घोषणा अपेक्षित आहे

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, या बजेटमध्ये (Budget) फिटमेंट फॅक्टरबाबत अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होऊ शकते. आगामी अर्थसंकल्पानंतर सरकार त्यात मोठे बदल करु शकते.

हा बदल झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपये आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल झाल्यास ते 26,000 रुपयांपर्यंत वाढेल.

2.57 वरुन 3.68 पट वाढ करण्याची मागणी

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात फिटमेंट फॅक्टरचा मोठा वाटा असतो. भूतकाळात, सूत्रांनी दावा केला होता की, सरकार (Government) 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी फिटमेंट फॅक्टरशी संबंधित मसुदा तयार करण्याच्या तयारीत आहे.

मसुद्यात फिटमेंट फॅक्टरच्या सुधारणेवर चर्चा होणे अपेक्षित आहे. फिटमेंट फॅक्टर 2.57 वरुन 3.68 पट वाढवण्याची कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासून मागणी आहे.

दुसरीकडे, सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. त्यानुसार, 18000 (18,000 X 2.57 = 46260) मूळ वेतनावर कर्मचाऱ्यांना 46260 रुपये मिळतात.

परंतु मागणीनुसार, त्यात 3.68 पट वाढ केल्यास, इतर भत्ते वगळून, पगार 26000 X 3.68 = 95680 रुपये होईल. याशिवाय, अर्थसंकल्पानंतर 1 मार्च 2023 रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत डीएबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. यावेळी महागाई भत्ता (डीए वाढ) 4 ते 42 टक्क्यांनी वाढू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NIA Raids: अल-कायदाच्या कटाचा पर्दाफाश! NIA ची 5 राज्यांमध्ये छापेमारी; बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने गुजरातमध्ये दहशतवादी कारवायांचे षडयंत्र

Bus Accident: भीषण अपघाताने हाहाकार! पिकअपला धडकून बस खोल दरीत कोसळली, 37 ठार, 24 जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

Terrorist: एखादी व्यक्ती स्वतःचा जीव देऊन इतरांना मारण्यासाठी का प्रवृत्त होते? कारण काय? दारिद्र्य, राजकारण की कट्टरता?

कॅसिनोनंतर आता 'स्पा'चा बाजार! पणजी 'थायलंड'च्या वाटेवर? मंत्री म्हणतात, 'हे स्पा माझे आहेत का?' - संपादकीय

Goa Live News: विकसित गोवा 2037 चा आराखडा 19 डिसें. रोजी गोव्यासमोर

SCROLL FOR NEXT