Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: DA बाबत आली मोठी बातमी, 'या' दिवशी मिळणार 50 टक्के महागाई भत्ता!

7th pay commission DA Hike: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्यात (DA Hike) पुन्हा एकदा बंपर वाढ करण्याचा विचार करत आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission DA Hike: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्यात (DA Hike) पुन्हा एकदा बंपर वाढ करण्याचा विचार करत आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

त्यात थेट वाढ होणार आहे. सरकारकडून महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ केली जाते. मार्चमध्येच सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. सरकार डीए कधी वाढवणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जुलैमध्ये वाढ होईल

सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचार्‍यांचा (Employees) महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला आहे, त्यानंतर महागाई भत्ता 42 टक्के झाला आहे.

ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू झाली. आता पुढील महागाई भत्ता जुलै 2023 पासून जाहीर होणार आहे. पुढील वाढ देखील 4 टक्के होईल, अशी अपेक्षा आहे.

पगारात बंपर वाढ होणार आहे

वाढत्या महागाईच्या (Inflation) काळात कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात चांगली वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामुळे आगामी काळात पगारवाढ होऊ शकते.

50 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर DA शून्य होईल

महागाई भत्त्याचा नियम असा आहे की, सरकारने 2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू केला, त्यावेळी महागाई भत्ता शून्य करण्यात आला होता.

नियमांनुसार, महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्य केला जाईल आणि 50 टक्क्यांनुसार कर्मचाऱ्यांना भत्ता म्हणून मिळणारे पैसे मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात जोडले जातील.

पगारात 9000 रुपयांनी वाढ होणार आहे

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्याला 50% DA च्या 9000 रुपये मिळतील.

परंतु, जेव्हा डीए 50 टक्के असेल तेव्हा तो मूळ पगारात जोडला जाईल आणि पुन्हा महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT