Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: सरकारने केली DA वाढीची घोषणा, आता 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पगार!

7th Pay Commission: सरकारी कर्मचारी आपला डीए वाढण्याची दीर्घकाळ वाट पाहत असतात. डीए वाढल्याने लोकांचा पगारही वाढतो.

Manish Jadhav

7th Pay Commission: सरकारी कर्मचारी आपला डीए वाढण्याची दीर्घकाळ वाट पाहत असतात. डीए वाढल्याने लोकांचा पगारही वाढतो. अशा परिस्थितीत लोक पगार वाढण्याची वाट पाहत असतात.

दरम्यान, देशातील एका राज्याने महागाई भत्त्यात (DA) वाढ लागू केली आहे. हे राज्य हिमाचल प्रदेश आहे. हिमाचल प्रदेश सरकारने राज्य सरकारचे कर्मचारी आणि माजी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (DA) वाढ लागू केली आहे.

डीए वाढ

राज्यात जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरु झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 15 एप्रिल रोजी हिमाचल दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी डीए वाढीची घोषणा केली होती आणि यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना देखील जारी केली आहे.

महागाई भत्ता वाढल्याने 2.15 लाख कर्मचारी आणि 90,000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह 3 लाखांहून अधिक लोकांना फायदा होणार आहे.

हिमाचल प्रदेश

यापूर्वी, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) सरकारचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त लोकांना 31 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. पात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के वाढीव दराने लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

त्यांनाही थकबाकीनुसार, भरपाई दिली जाईल. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 500 कोटी रुपयांचा बोजा वाढेल, असा अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे.

भत्ता रोखीने दिला जाणार

एप्रिल 2023 नंतर मिळालेला भत्ता रोखीने दिला जाईल, जानेवारी 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंतची थकबाकी सामान्य भविष्य निर्वाह निधी खात्यात भरली जाईल, असेही राज्याच्या मुख्य सचिवांनी नोटीसमध्ये सांगितले आहे. 1 जानेवारी 2022 नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना (Employees) त्यांचा महागाई भत्ता रोख स्वरुपात मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT