7th Pay Commission | Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज मिळणार आनंदाची बातमी, DA मध्ये होणार मोठी वाढ!

DA Hike News: तुम्ही स्वत: केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य केंद्रीय कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

DA Hike News: तुम्ही स्वत: केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य केंद्रीय कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. होय, आज एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा होणार आहे.

आज कामगार मंत्रालयाकडून AICPI निर्देशांक जाहीर केला जाणार आहे. या आधारे सरकारकडून (Government) डीए निश्चित केला जाईल. 2023 मध्ये सरकारकडून दुसऱ्यांदा महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाणार आहे.

सध्या 42 टक्के दराने डीए मिळत आहे

दरम्यान, आज येणार्‍या AICPI निर्देशांकाच्या आकड्यांच्या आधारे पुढील महागाई भत्ता ठरवला जाईल. किती असेल आणि कधी जाहीर होईल? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने डीए दिला जात आहे.

1 जुलैपासून ते 4 टक्क्यांनी 46 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. आज संध्याकाळी किती महागाई भत्ता वाढवायचा हे निश्चित होईल.

DA इतका वाढू शकतो

दुसरीकडे, 1 जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Employees) किती महागाई भत्ता मिळणार याबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. मात्र जानेवारी ते मे या कालावधीतील आकडेवारीनुसार डीए 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

ICPI निर्देशांकाचा जूनचा डेटा आज येईल. मात्र, सध्या उपलब्ध असलेला 42 टक्के डीए आगामी काळात 46 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकीसह ही रक्कम दिली जाणार आहे.

HRA मध्ये देखील बंपर बूम असेल

सातव्या वेतन आयोगांतर्गत, डीए नंतर एचआरएमध्ये वाढ होणे बंधनकारक आहे. मात्र, महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे जाईल तेव्हा यात वाढ होईल. यात अजून सहा महिन्यांहून अधिक कालावधी आहे.

सध्या शहरांच्या श्रेणीनुसार एचआरएची विभागणी केली जाते. त्याला X, Y, Z असे नाव देण्यात आले आहे. X शहरात राहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना अधिक HRA मिळेल. Y आणि Z शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यापेक्षा कमी HRA मिळेल. शहरानुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के एचआरए उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: जि.पं. आरक्षणावर मंगळवारी सुनावणी, राज्य निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस

Horoscope: तुमचे नशीब उजळणार! व्यवसायात भरभराट! 'या' 4 राशींसाठी 17 नोव्हेंबरपासून चांगले दिवस

IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्समध्ये 'महाबदल'! आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यरसह 9 स्टार खेळाडूंना नारळ

Pimpal Tree: शेकडो वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने लावलेला, मोंहेजदाडो,- हडप्पा काळापासून सापडणार सर्वात प्राचीन वृक्ष 'पिंपळ'

Goa Made Liquor Seized: सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूची विक्री; 90 दारूच्या बाटल्या जप्त, दोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT