Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांची चांदी, मूळ वेतन 27000 पर्यंत वाढणार; 'या' तारखेपासून लागू होणार नियम!

DA Hike Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात शेवटची वाढ मार्च 2023 मध्ये जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी सरकारने डीए 38 टक्क्यांवरुन 42 टक्के केला होता.

Manish Jadhav

DA Hike Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात शेवटची वाढ मार्च 2023 मध्ये जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी सरकारने डीए 38 टक्क्यांवरुन 42 टक्के केला होता. आता पुढील महागाई भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे.

मात्र, सप्टेंबरपर्यंत त्याची घोषणा होणे अपेक्षित आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी वाढवला जातो. महागाईच्या प्रमाणात डीए वाढल्याने पगारात चांगली वाढ झाली आहे.

कर्मचार्‍यांचा पगार फिटमेंट फॅक्टर, अप्रेजलच्या आधारे वाढतो. फिटमेंट फॅक्टर वाढला की, पगार आपोआप वाढतो. फिटमेंट फॅक्टर आणि अप्रेजलशिवाय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात प्रचंड वाढ होणार असल्याची बातमी आहे.

डीए बेसिकमध्ये विलीन झाल्यामुळे पगार वाढेल

दरम्यान, 2016 मध्ये सरकारने (Government) 7 वा वेतन आयोग लागू केला होता. त्यावेळी महागाई भत्ता शून्य करण्यात आला होता. शून्य डीएमुळे कर्मचाऱ्यांचा पूर्वीचा महागाई भत्ता मूळ वेतनात जोडला गेला. आता पुन्हा एकदा ही परिस्थिती निर्माण होणार आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18000 रुपयांवरुन 27000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. मूळ वेतनात महागाई भत्ता विलीन केल्यामुळे मूळ वाढ होईल.

वेतन सुधारणेसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा

2016 च्या मेमोरँडममध्ये असे लिहिले होते की, जेव्हा महागाई भत्ता (DA) 50 टक्के असेल तेव्हा तो शून्यावर आणला जाईल.

म्हणजेच आता मिळणारा महागाई भत्ता 42 टक्के आहे. शून्यानंतर ते 1 टक्के, 2 टक्के पासून सुरु होईल. वास्तविक, 50 टक्के महागाई भत्ता (DA Hike) होताच, तो मूळ वेतनात जोडला जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना (Employees) वेतन सुधारणेसाठी फार काळ थांबावे लागणार नाही.

कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार?

सध्या पे बँड लेव्हल-1 मध्ये मूळ वेतन रु. 18000 आहे. सध्या यावर 7560 रुपये महागाई भत्ता मिळतो. परंतु, 50 टक्के महागाई भत्त्यावर ही रक्कम 9000 रुपये होईल. नियम असा आहे की, जेव्हा 50 टक्के डीए असेल तेव्हा तो मूळ वेतनामध्ये अॅड करुन शून्य केला जाईल.

म्हणजेच सध्याचे 18000 रुपये असलेले मूळ वेतन वाढून 27000 रुपये होईल. यानंतर, 27000 रुपयांच्या मूळ वेतनावर महागाई भत्ता मोजला जाईल.

मूळ पगार कधी वाढणार?

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्त्यानुसार पगार मिळत आहे. जुलै 2023 च्या सुधारणेवर आधारित, ते 4 टक्क्यांनी वाढून 46 टक्के होईल.

त्यानंतर जानेवारी 2024 मध्येही महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला तर तो 50 टक्के होईल. जर ते 50% असेल तर जानेवारी 2024 पासूनच महागाई भत्ता शून्य होईल.

म्हणजेच जुलै 2024 पासून कर्मचार्‍यांना वाढीव मूळ वेतनाचा लाभ मिळेल आणि त्या आधारे त्यांना डीए देखील मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मी चाललोय, काहीतरी रंजक घडेल!',आरजीच्या पाठोपाठ पालेकरांची दिल्लीवारी; Watch Video

अग्रलेख: '...आंबेडकरांच्या 'संघराज्या'च्या व्याख्येने गोव्याला दिली वेगळी ओळख!

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

SCROLL FOR NEXT