Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: होळीपूर्वी पगारात होणार बंपर वाढ, कर्मचाऱ्यांचा DA एवढ्या टक्क्यांनी वाढणार !

7th Pay Matrix News: सरकार पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करु शकते. एआयसीपीआय इंडेक्सच्या आकडेवारीवरुन ही बाब समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission DA Hike: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही नवीन वर्षात DA वाढीची वाट पाहत असाल तर होळीपूर्वीच तुमच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. सरकार पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करु शकते. एआयसीपीआय इंडेक्सच्या आकडेवारीवरुन ही बाब समोर आली आहे.

डीएमध्ये दोनदा वाढ केली आहे

सरकार कर्मचाऱ्यांच्या (Employees) महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ करते. पहिली वाढ जानेवारी महिन्यात तर दुसरी वाढ जुलै महिन्यात केली आहे. नवीन वर्ष सुरु झाले आहे, त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या डीएमध्ये वाढ होण्याची प्रतीक्षा आहे.

4 टक्के वाढू होऊ शकते

आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, हे स्पष्ट झाले आहे की, यावेळीही सरकार महागाई भत्त्यात 4 टक्के किंवा 3 टक्क्यांपर्यंत वाढ करु शकते. यासाठी एआयसीपीआय निर्देशांकाला नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांत 0.4 अंकांनी वाढ करावी लागेल.

लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे

कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढ झाल्यास, महागाई भत्ता 42 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. जुलै 2022 मध्येही सरकारने (Government) कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली होती. डीए आणि डीआरमध्ये वाढ झाल्याने 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

DA 42 टक्के दराने वाढल्यास लेव्हल-3 च्या पगारात किती वाढ होईल?

>> कर्मचार्‍याचे मूळ वेतन - रु 56900

>> नवीन महागाई भत्ता (42%) – रु 23898/महिना

>> आत्तापर्यंत महागाई भत्ता (38 टक्के) - रु 21622/महिना

>> महागाई भत्ता किती वाढला - 23898-21622 = रु 2276/महिना

>> वार्षिक पगारात वाढ - 2276X12= रु. 27312

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT