7th Pay Commission| Money  Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA बाबत आनंदाची बातमी, आता दर महिन्याला खात्यात येणार एवढे पैसे!

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मे महिन्याच्या अखेरीस आनंदाची बातमी आली आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मे महिन्याच्या अखेरीस आनंदाची बातमी आली आहे. काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची आकडेवारी पूर्णपणे स्पष्ट होईल.

मात्र, एप्रिलमध्ये आलेल्या एआयसीपीआय निर्देशांकाच्या आधारे हे स्पष्ट झाले आहे की, यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये किती वाढ होणार?

एप्रिलच्या आधारावर आलेल्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. यावरुन कर्मचाऱ्यांचा डीए 42 टक्क्यांवरुन 46 टक्के होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

42 टक्के महागाई भत्ता दिला जातो

सध्या, सरकारकडून कर्मचाऱ्यांना (Employees) 42 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. 4 टक्क्यांच्या वाढीनंतर तो 46 टक्के होईल. यावेळी AICPI निर्देशांकात 0.72 अंकांची वाढ झाली आहे. या आकडेवारीत वाढ झाल्याने 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 48 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

यापूर्वी, 1 जानेवारी 2023 पासून सरकारकडून नवीन महागाई भत्ता लागू करण्यात आला होता. नवीन महागाई भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सरकारकडून याबाबतची घोषणा केली जाईल.

एप्रिलचा आकडा गेल्या मे महिन्यात आला होता

केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता केवळ AICPI निर्देशांकाच्या आधारे ठरवला जातो. पहिल्या महिन्याचा AICPI डेटा प्रत्येक महिन्याच्या शेवटी जारी केला जातो. गेल्या मे महिन्यात एप्रिलचा आकडा जाहीर झाला आहे.

मार्चच्या तुलनेत एप्रिलचा AICPI निर्देशांक वाढला आहे. मार्चमध्ये तो 133.3 अंकांवर होता, तो आता 0.72 अंकांनी वाढून 134.02 वर पोहोचला आहे. यावरुन यावेळीही डीएमध्ये चांगली वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फेब्रुवारीमध्ये ही संख्या कमी झाली

यावर्षी, जानेवारी ते एप्रिल या कालावधीत फेब्रुवारीमध्ये ही संख्या कमी झाली. उर्वरित महिन्यांत त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जानेवारी 2023 मध्ये, AICPI निर्देशांक 132.8 अंकांवर होता.

यानंतर फेब्रुवारीमध्ये तो 132.7 अंकांवर घसरला. मार्चमध्ये त्यात मोठी वाढ झाली आणि तो 133.3 अंकांवर पोहोचला. आता एप्रिलमध्ये तो 134.02 अंकांपर्यंत वाढला आहे.

तसेच, एप्रिलच्या AICPI निर्देशांकाच्या आधारे, महागाई भत्ता 45 टक्क्यांहून अधिक वाढून 45.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. मे आणि जूनसाठी एआयसीपीआय निर्देशांकाची संख्या अजून येणे बाकी आहे.

डीए 45 टक्क्यांच्या पुढे गेल्याने, यावेळीही 4 टक्क्यांनी वाढून 46 टक्क्यांपर्यंत वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी, मार्चच्या आकडेवारीवर आधारित, डीए स्कोअर 44.46 टक्के होता.

डेटा कोण जारी करतो?

एआयसीपीआय निर्देशांकाच्या आधारे हे ठरवले जाते की, सरकार (Government) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ करणार? दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाद्वारे जारी केली जाते. हा निर्देशांक 88 केंद्रांसाठी आणि संपूर्ण देशासाठी तयार करण्यात आला आहे.

किती पैसे वाढतील

सध्या सरकारी कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्यावर त्याला 42 टक्के महागाई भत्ता म्हणजेच 7560 रुपये मिळतात. पण महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढला, तर महागाई भत्ता दरमहा 8280 रुपये होईल. त्यानुसार दरमहा 720 रुपयांनी पगार वाढणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT