Dearness Allowance DA Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: जुनी पेन्शन बहाल केल्यानंतर सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले

Dearness Allowance DA Hike: हिमाचल प्रदेश सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करुन मोठा दिलासा दिला आहे.

Manish Jadhav

Dearness Allowance DA Hike: हिमाचल प्रदेश सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करुन मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वी, राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्ववत करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती.

राज्य सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपासून जुनी पेन्शन लागू केली आहे. यानंतर, सरकारने महागाई भत्ता/महागाई सवलत (DA/DR) ची भेट दिली आहे. 1 जानेवारी 2022 पासून सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळेल.

दीड वर्षापूर्वी डीए लागू झाला

हिमाचल सरकारच्या वतीने महागाई भत्ता जाहीर करताना राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त महागाई भत्ता (डीए) मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

मुख्य सचिवांनी एक अधिसूचना जारी करुन म्हटले आहे की, 1 जानेवारी 2022 पासून महागाई भत्ता (डीए वाढ) सध्याच्या 31 टक्क्यांवरुन 34 टक्के करण्यात आला आहे.

सरकारचा (Government) आदेश अखिल भारतीय सेवा, हिमाचल प्रदेश न्यायिक सेवा आणि UGC संवर्गांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू होईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 42% DA

यापूर्वी, राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्यासाठी सरकारने अधिसूचना जारी केली होती.

यासोबतच महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्याची घोषणाही सरकारने केली होती. 1 जानेवारी 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Employees) डीएमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सरकारने ती 38 टक्क्यांवरुन 42 टक्के केली आहे, जी 1 जानेवारी 2023 पासून लागू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस आमदार गेले कुठे?

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ हत्तीसाठी वनताराशी संपर्क! विश्वजीत राणे बंदोबस्तासाठी सरसावले; वन खाते ॲक्शन मोडमध्ये

Women Reservation Bill: भाजपचा 'महिला कार्ड' खेळण्याचा डाव? डॉ. अंजली निंबाळकरांचा हल्लाबोल! "आरक्षणाची एवढीच ओढ असेल, तर सीमांकनाची वाट का पाहताय?"

Panaji Lake Fish Death: न्यायालयाचा चाबूक! मळा तलावातील मासे मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल, महापालिकेची लपवाछपवी थांबवा; सांडपाण्याचे नकाशे द्या, कोर्टाचे निर्देश

St Francis Xavier Controversy: यू-ट्यूबर गौतम खट्टरची उलटगणती सुरु! दोन दिवसांत होणार अटक, मुख्यमंत्री सावंतांचा कडक इशारा; तपास 'क्राईम ब्रांच'कडे!

SCROLL FOR NEXT