E-Waste Dainik Gomantak
अर्थविश्व

E-Waste: काय कारण आहे की यावर्षी जगभरातील 5.3 अब्ज फोन फेकून दिले जातील

2019-20 मध्ये भारतात 10,14,961 टन ई-कचरा निर्माण झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

जगभरातील 5.3 अब्ज फोन यावर्षी फेकून दिले जातील. भारतीय लोकसंख्येच्या जवळपास तिप्पट ही संख्या आहे. वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या प्रतिबंधावर काम करणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली आहे. जुन्या फोनचा पुनर्वापर करण्याऐवजी तो जवळ बाळगणाऱ्यांची संख्या अधिक आहे. असे देखील या संस्थेने म्हटले आहे.

इलेक्ट्रॉनिक कचरा निर्मितीच्या बाबतीत भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा देश आहे. भारतात दरवर्षी सुमारे दहा लाख टन ई-कचरा निर्माण होतो. भारतीय शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात संगणकांची संख्या सर्वाधिक आहे. अशा ई-कचऱ्यामध्ये 40 टक्के शिसे आणि 70 टक्के जड धातू आढळून आले आहेत. देशभरात लाखो टन ई-कचऱ्यापैकी केवळ तीन ते दहा टक्के कचरा जमा होतो, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.

स्मार्टफोनमध्ये 62 धातू असू शकतात. आयफोनच्या पार्ट्समध्ये सोने, चांदी आणि पॅलेडियम यांसारखे मौल्यवान धातू देखील असतात, जे आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये उत्खनन केले जातात. ई-कचऱ्यामध्ये मौल्यवान धातूंचे प्रमाण किती आहे याची लोकांना कल्पना नाही. ते म्हणतात की या वरवर सामान्य वाटणाऱ्या गोष्टी जागतिक स्तरावर केल्या तर, त्याचे प्रमाण अधिक होऊ शकते याची लोकांना कल्पना नाही. असे वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट संस्थेचे महासंचालक पास्कल लेरॉय म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये संपूर्ण जगात 50 दशलक्ष टन ई-कचरा जमा झाला होता. संगणक उत्पादने, स्क्रीन, स्मार्टफोन, टॅब्लेट, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि हीटिंग किंवा कूलिंग डिव्हाइसेसचा या कचऱ्यात सर्वाधिक समावेश होता. यापैकी केवळ 20 टक्के कचऱ्याचा पुनर्वापर केला गेला, बाकीचा कचरा खुल्या जमिनीवर किंवा नद्या आणि महासागरांपर्यंत पोहोचला.

राष्ट्रीय हरित लवादने डिसेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2017-18 मध्ये ई-कचरा संकलनाचे लक्ष्य 35,422 टन होते, परंतु संकलन केवळ 25,325 टन झाले. त्याचप्रमाणे, 2018-19 मध्ये 1,54,242 टनांचे उद्दिष्ट होते परंतु 78,281 टन जमा झाले. आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 2019-20 मध्ये भारतात 10,14,961 टन ई-कचरा निर्माण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT