Biryani order on swiggy on 31st december 2023. Dainik Gomantak
अर्थविश्व

Swiggy वरून दर मिनिटाला फस्त झाल्या 1244 बिर्याणी, Zomato डिलिव्हरी बॉइजना मिळाली 97 लाखांची टीप

New Year Celebration: स्विगीला दर मिनिटाला बिर्याणीच्या १,२४४ ऑर्डर मिळल्या. तर स्विगीला ३१ डिसेंबरला बिर्याणीच्या एकूण ४.८ लाख ऑर्डर मिळाल्या होत्या.

Ashutosh Masgaunde

1244 biryanis sold every minute from Swiggy, Zomato delivery boys got tip of 97 lakhs, On 31 December:

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर रोजी ई-कॉमर्स कंपन्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या आहेत. Zomato, Blinkit, Swiggy आणि Food Instamart सारख्या कंपन्या या ऑर्डर पूर्ण करण्यात व्यस्त होत्या.

स्विगीला दर मिनिटाला बिर्याणीच्या १,२४४ ऑर्डर मिळल्या. तर स्विगीला ३१ डिसेंबरला बिर्याणीच्या एकूण ४.८ लाख ऑर्डर मिळाल्या. म्हणजेच प्रत्येक मिनिटाला 1,244 ऑर्डर पूर्ण केल्या आहेत. यापैकी प्रत्येक चौथी बिर्याणी हैदराबादहून मागवण्यात आली आहे.

दरम्यान, डिलिव्हरी बॉइजना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला Zomato वरून दिलेल्या ऑर्डर्सवर यंदा सुमारे 97 लाख रुपयांची टीप मिळाली.

2 लाख किलो कांद्याचीही विक्री

Zomato चे CEO दीपंदर गोयल यांनी पोस्ट केले की, यंदाच्या 31 डिसेंबरला आम्ही जवळपास सर्व ऑर्डर पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे कोलकाता येथील एका व्यक्तीने एकाच वेळी 125 पदार्थ ऑर्डर केले होते. सर्व 125 पदार्थ रुमाली रोटीचे आहेत. झोमॅटोला महाराष्ट्रातून सर्वाधिक ऑर्डर मिळाल्या आहेत.

त्याच वेळी, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला स्विगीच्या इंस्टामार्टवर सुमारे 2 लाख किलो कांदे आणि 1.8 लाख किलो बटाटे विकले गेले.

97 लाखांची टीप

31 डिसेंबर रोजी रात्री 8.06 पर्यंत झोमॅटोला सुमारे 8,422 ऑर्डर्स प्राप्त झाल्या होत्या. म्हणजे प्रत्येक सेकंदाला 140 ऑर्डर.

डिलिव्हरी बॉइजना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला Zomato वरून दिलेल्या ऑर्डरवर सुमारे 97 लाख रुपयांची टीप मिळाली.

मागील विक्रम मोडले

2023 च्या पूर्वसंध्येला, Zomato ने 2015, 2016, 2017, 2018, 2019 आणि 2020 मध्ये एकत्र मिळून जितक्या ऑर्डर वितरित केल्या होत्या तितक्याच ऑर्डर यंदा 31 डिसेंबरला वितरित केल्या आहेत.

कंपनीला 1.47 लाख चिप्स पॅकेट्सची ऑर्डर मिळाली. 68,231 सोडा बाटल्या मागवण्यात आल्या. सुमारे 356 लाइटरच्या ऑर्डर्सही आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT