Nirmala Sitharaman Annaunce Package Dainik gomantak
अर्थविश्व

कोरोना बाधित क्षेत्राला १.१ कोटींचं पॅकेज तर आरोग्य विभागाला ५० हजार कोटी - अर्थमंत्री निर्मला सितारामण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोविड बाधित क्षेत्रासाठी 1.1 लाख कोटी रुपयांच्या कर्जाची हमी जाहीर केली आहे. यासह आरोग्य क्षेत्रासाठी 50,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे

दैनिक गोमन्तक

कोरोनाच्या(Covid -19) दुसर्‍या लाटेमुळे रुळावरून घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत . केंद्रीय अर्थमंत्री(Finance Minister) निर्मला सीतारमण(Nirmala Sitharaman) यांनी कोविड बाधित क्षेत्रासाठी 1.1 लाख कोटी रुपयांच्या कर्जाची हमी जाहीर केली आहे. यासह आरोग्य क्षेत्रासाठी 50,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे .आज पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली आहे.

मागील एक ते दीड वर्षांपासून देशात कोरोनाने थैमान घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली पण त्याचपाठोपाठ देशावर आर्थिक संकट देखील ओढवलं गेल. या आर्थिक संकटात अनेक लोकांचं आर्थिक गणितचं ढसाळल. लॉकडाऊनमुळे देशातील सामान्य नागरिक, छोटे उद्योजक तसेच अनेक क्षेत्रातील लोक डबघाईला आले अशा लोकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्राकडून याआधीही अनेक योजना जाहीर केल्या असताना आज पुन्हा एकदा केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रासोबतच एकूण ८ क्षेत्रांसाठी नव्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य सुविधेसाठी ५० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.

आरोग्य क्षेत्राला अधिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने हि घोषणा केली आहे. या निधीचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणीसाठी होणार. याव्यतिरिक्त इतर विभागांसाठी ६० हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे.

याचबरोबर अर्थमंत्र्यांनी छोटया उद्योगांना पाठबळ देण्यासाठी आपातकालीन क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेत (ईसीएलजीएस) निधी वाढवण्याची घोषणाही केली आहे. सध्या ही योजना 3 लाख कोटी रुपयांची असून ती आता साडेचार लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एमएसएमईला आतापर्यंत 2.69 लाख कोटी रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती निर्मला सीतारामण यांनी दिली आहे.

याशिवाय याशिवाय मायक्रो फायनान्स संस्थांकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी योजना जाहीर केली गेली आहे. ही एक नवीन योजना असून या अंतर्गत वाणिज्य बँकांच्या एमएफआयना दिलेल्या नव्या व विद्यमान कर्जाची हमी दिली जाईल. या योजनेचा 25 लाख लोकांना लाभ होण्याची अपेक्षा आहे.

क्रेडिट गॅरंटी योजनेंतर्गत कोविड बाधित 25 लाखाहून अधिक लोकांना 3 वर्षांसाठी 1.25 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. या कर्जावरील व्याज दर बँकांसाठी निश्चित केलेल्या एमसीएलआरपेक्षा 2% जास्त असेल.

तसेच पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी त्या क्षेत्रातही अनेक बदल करत देशात येणाऱ्या पहिल्या ५ लाख परदेशी व्यक्तींना व्हिजा शुल्क द्यावं लागणार नाही. व्हिजा देण्यास सुरुवात झाल्यानंतर ३१ मार्च २०२२ पर्यंत ही योजना लागू असेल. यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होईल. परंतु यात पर्यटकाला किंवा परदेशी व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे . या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर १०० कोटींचा भार पडणार असल्याचही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim: लोकांच्या जीवाशी खेळ! उड्डाण पुलाच्या कामामुळे चालकांना धोका, वास्कोत नियमांची ऐशीतैशी; सळ्यांची धोकादायक वाहतूक

Vijay Merchant Trophy 2025: गोव्याची एक डाव, 152 धावांनी हार! दुसऱ्याच दिवशी पराभव; सलग तिसऱ्यांदा हाराकिरी

Goa ZP Election: पंचायत मंत्री माविन गुदिन्होंनी बजावला मतदानाचा हक्क! म्हणाले, 'हा लोकशाहीचा उत्सव'

India T20 World Cup Squad: सूर्यकुमारसाठी हा 'वर्ल्डकप' शेवटचा? हरपलेल्या फॉर्ममुळे वाढले टेन्शन; गिलबाबतही प्रश्नचिन्ह

स्वातंत्र्यसैनिकांनी जो गोवा दिला, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी! CM सावंतांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT