Banks Dainik Gomantak
अर्थविश्व

बँकिंग क्षेत्राला एका वर्षत 1,02,252 कोटी इतका नफा

एचडीएफसी बँक आणि एसबीआय या दोन बँकांनी उद्योगाच्या एकूण नफ्यापैकी 50 टक्के नफा कमावला आहे

दैनिक गोमन्तक

बँकिंग क्षेत्राने मागील एका वर्षात सर्वाधिक नफा कमावला आहे . आथिर्क वर्ष 2021 बँकांचा एकूण नफा 1,02,252 करोड इतका झाला आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या महामारीमुळे आपली आर्थिक व्यवस्था डबघाईला आली असूनसुद्धा बँकांनी हा विक्रमी नफा कमावला आहे. मागील वर्ष म्हणजे 2019 या आर्थिक वर्षाचा विचार करता बँकांना 5,000 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन करावा लागला होता . त्या तुलनेने बँकिंग क्षेत्राला ही वाढ समाधान देणारी ठरली आहे .

एचडीएफसी बँक आणि एसबीआय या दोन बँकांनी उद्योगाच्या एकूण नफ्यापैकी 50 टक्के नफा कमावला आहे एचडीएफसी बँकेने असून नफ्यापैकी 31,116 करोड रुपये म्हणजेच एकूण 30% करोड रुपयांचा नफा मिळवला आहे. तसेच देशातील सर्वती मोठी म्हणजेच एसबीआयची यात 20% रक्कम म्हणजेच 20,410 कोटी रुपये इतकी आहे . तर या यादीत तिसऱ्या स्थानावर आयसीआयसीआय बँक आहे जिने 16,192 कोटी रुपये म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने नफा मिळवला आहे. तर दुसऱ्याबाजूला पंजाब अँड सिंध बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा या वर्षी निव्वळ तोटा झालाआहे .

याबरोबरच खाजगी क्षेत्राचा विचार करता येस बँकेला एकूण 4622 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान सध्या एकूण आर्थिक क्षेत्राचा विचार करता तसेच अनेक बँकेचे काही डिफॉल्टर पाहता येणाऱ्या आर्थिक वर्षात या नफ्यामध्ये अनेक बदल दिसू शकतील हे नक्की

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT