Goa Rain Dainik Gomantak
Video

Goa Rain: ऑक्टोबरांत विक्रमी पावस; Video

October Rain: मान्सूनोत्तर पावसात यंदा तब्बल १९.१५ इंच इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद मुरगावात करण्यात आली आहे. राज्यात यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात गोव्यात मान्सून दाखल झाला.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात यंदा मान्सूनोत्तर कालावधीत ऑक्टोबर महिन्यात सरासरी १४ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली, जी ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या मान्सूनोत्तर पावसाच्या तुलनेत विक्रमी तब्बल १२१ टक्के अधिक पाऊस असल्याचे गोवा वेधशाळेने म्हटले आहे.

राज्यात सर्वसामान्यपणे मुरगाव तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी पावसाची नोंद होते; परंतु मान्सूनोत्तर पावसात यंदा तब्बल १९.१५ इंच इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद मुरगावात करण्यात आली आहे. राज्यात यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात गोव्यात मान्सून दाखल झाला, तो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत होता. राज्यातील मान्सूनपूर्व, मान्सून आणि मान्सूनोत्तर पाऊस पाहता आतापर्यंत यंदा राज्यात सरासरी १६२.४८ इंच इतक्या पावसाची नोंद केली आहे. दरम्यान, शुक्रवारपासून (ता. ३१) राज्यात तुरळक पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FIDE World Cup: फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्‍घाटन! 82 देशांतील 206 खेळाडूंचा सहभाग

'हा तर मराठी भाषिक तरुणांचा गळा घोटण्याचा प्रयत्न'! राजभाषा समितीचा एल्गार; कोकणी परीक्षेची सक्ती रद्द करण्याची मागणी

Khandola: खांडोळा ग्रामसभेत कचरा समस्येवर संताप व्यक्त! रस्त्यांवर दुर्गंधी; देवळाय परिसरात परिस्थिती गंभीर

Goa Today's News Live: गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचा कहर, साखळीत वाळंवटी नदीला पूर

जल वाहतुकीसाठी राज्यात होणार आधुनिक नियंत्रण प्रणाली! 50 कोटींची गुंतवणूक; बंदरांवरील ताण होणार कमी

SCROLL FOR NEXT