Goa Monsoon: अनिश्चित पाऊस आणि बदलत्या हवामानाचा गोव्याला फटका! तापमानाचा पारा 32 अंशांवर

Goa Rain Update: आतापर्यंत राज्यात सरासरी ३४३ मिमी म्हणजेच १३.५० इंच पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल १०४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पणजी: राज्यात मॉन्सून कालावधीत सर्वाधिक म्हणजे वाळपई केंद्रावर तब्बल २१७ इंच पावसाची नोंद करण्यात आली होती. आता मॉन्सूनोत्तर पावसातही आतापर्यंत वाळपईत सर्वाधिक ४८८ मिमी म्हणजेच १९.२१ इंच पावसाची नोंद करण्यात आली असून पुढील काही दिवस जर असाच पाऊस पडत राहिला तर लवकरच २० इंच पावसाची नोंद करण्यात येईल.

आतापर्यंत राज्यात सरासरी ३४३ मिमी म्हणजेच १३.५० इंच पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल १०४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. रविवारीदेखील मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने गोवा वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या २४ तासांत १.९ मिमी पावसाची नोंद केली असून सांगे येथे १५.१ मिमी आणि साखळीत ८.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

तापमानाचा पारा ३२ अंशांवर

राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होते; परंतु अजून थंडीचा थांगपत्ता नाही. राज्यातील घाटालगतच्या भागात पहाटे धुके दाटते; परंतु हवेत अजूनही गारवा नाही. परंतु राज्यात कमाल तापमानाचा पारा ३२.६ अंश सेल्सिअसवर गेला असून मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असल्याने नागरिक हैराण आहेत. येत्या काही दिवसांत राज्यात तापमानाचा पारा कमी होत थंडीला सुरुवात होईल, असे डॉ. रमेश कुमार (एनआयओ शास्त्रज्ञ) यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com