Bicholim: खाणपट्टी भागातील विद्यार्थ्यांसाठी डिचोलीत 'स्कूल बस'ची व्यवस्था

Bicholim School Bus: डिचोली मतदारसंघातील खाणव्याप्त परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस सुरू करण्यात आली आहे.

डिचोली: डिचोली मतदारसंघातील खाणव्याप्त परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस सुरू करण्यात आली आहे. बुधवारी येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते या बससेवेचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, उपनगराध्यक्ष दीपा पळ यांच्यासह अन्य नगरसेवक, कदंब महामंडळाचे अधिकारी, अडवलपाल सरपंच सुबत्ता सामंत, उपसरपंच विनेश्री गावकर, मुळगाव सरपंच मानसी कवठणकर, विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, सदाशिव वालावलकर, राजेश धोंड, भाजप मंडळ अध्यक्ष डॉ. कौस्तुभ पाटणेकर, विश्‍‍वास गावकर आदी मान्यवरांसह श्री शांतादुर्गा विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षणाबाबतीत सरकार गंभीर असून वाहतूक वा अन्य कारणांमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत, असे आमदार डॉ. शेट्ये यांनी सांगून स्कूल बस सुरू केल्याबद्दल जिल्हा मिनरल आणि ‘कदंब’ला धन्यवाद दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com