Sanquelim Theft: साखळी बाजारात घरफोडी, 1 लाखांची रोकड लंपास

Sankhali Market Theft: एका कॉस्मेटिक दुकानमालकाने आपल्या घरातील कपाटात एक लाख रोख ठेवली होती. गुरुवारी रात्री चोरट्यांनी या घराचे दार फोडले व आतील सर्व ठिकाणी शोधाशोध केली.

साखळी: साखळी बाजारातील एका घराचे दार फोडून एक लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. गुरुवारी, २४ एप्रिल रोजी रात्री उशिरा हा चोरीचा प्रकार घडला. शुकवारी (ता. २५) सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला प्रारंभ केला. उपलब्ध माहितीनुसार, एका कॉस्मेटिक दुकानमालकाने आपल्या घरातील कपाटात एक लाख रोख ठेवली होती. गुरुवारी रात्री चोरट्यांनी या घराचे दार फोडले व आतील सर्व ठिकाणी शोधाशोध केली. त्यांना कपाटात एक लाख रोख मिळाली. खोलीतील सर्व साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त केले होते. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तपासाला सुरुवात झाली. या भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले आहे. त्यानुसार चौकशी करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलीस अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com