डिचोली बाजारातील गटारांची दयनीय अवस्था; नागरिकांची गैरसोय, पालिकेने लक्ष देण्याची मागणी

Bicholim market drainage issue: डिचोली शहरातील बाजारातील गटारांची सद्यस्थिती अत्यंत बिकट झाली असून, यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

डिचोली शहरातील बाजारातील गटारांची सद्यस्थिती अत्यंत बिकट झाली असून, यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज संकुलाजवळ किमान तीन ते चार गटारांची अवस्था गंभीर असून, सोमवारी (दि. २८) एक वाहनही गटारात अडकल्याचा प्रकार घडला. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भर बाजारात गटारांची अशी दयनीय अवस्था असल्याने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, गटारे पाण्याने भरून वाहत आहेत. यामुळे अनेकवेळा गटारे उघडीच राहत असल्याने, काही नागरिक नकळत त्यात पडून जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत.

आगामी गणेश चतुर्थीच्या काळात बाजारात नागरिकांची गर्दी आणखी वाढणार असल्याने, ही समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, डिचोली नगरपालिकेने तातडीने याकडे लक्ष देऊन गटारांची दुरुस्ती करावी आणि सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून आणि व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com