Mulgao Locals Protest: गाव वाचवण्यासाठी विधानसभेवर मोर्चा काढू; मुळगांववासी आक्रमक

Mulgao Mining: खाण लीज क्षेत्रप्रकरणी सरकारकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप झालेल्या बैठकीत मुळगावच्या लोकांनी केला.

डिचोली: खाणप्रश्नी मुळगाववासीय आपल्या भूमिकेशी ठाम आहेत. खाण लीज क्षेत्रप्रकरणी सरकारकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप आज (शनिवारी) झालेल्या बैठकीत मुळगावच्या लोकांनी केला. गावच्या अस्तित्वासाठी वेळप्रसंगी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा निर्णयहीआजच्या मुळगाव येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.


मुळगाव कोमुनिदादचे अध्यक्ष महेश्वर परब यांनी हा ठराव घेताच उपस्थितांनी त्याला पाठिंबा दिला. खाणीला आमचा विरोध नाही. मात्र, गाव सांभाळा, अशी मुळगाववासीयांची भूमिका आहे. गेल्या मंगळवारी (ता.१८) पणजी येथे उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे आज मुळगाववासीयांनी एक बैठक आयोजित केली होती.

मुळगावच्या श्री केळबाय मंदिरात झालेल्या या बैठकीस सरपंच मानसी कवठणकर यांच्यासह पंचसदस्य तसेच देवस्थान, कोमुनिदाद, शेतकरी आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी खाण लीजप्रश्नी लक्ष घालण्याची ग्वाही देऊनसुद्धा खासदार श्रीपाद नाईक यांनी आता मौन बाळगले आहे, अशी टीका माजी सरपंच वसंत गाड यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com