Bicholim News: लामगाव-डिचोलीत बिबट्याचा संचार; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard At Lamgao Bicholim
मये: लामगाव डिचोली येथील रहिवाशांच्या विनंतीनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी गावातील जंगलात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. डिचोली मधील लामगाव गावात बिबट्या दिसल्याची नोंद आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून बिबट्याच्या हालचाली निदर्शनास आल्याचा दावा रहिवासी करत होते. विष्णू जननायक यांच्या मालकीच्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने घराच्या कुंपणात घुसून गंभीर जखमी केल्याची माहिती स्थानिक देविदास गोवेकर यांनी दिली होती. त्यामुळे लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची विनंती केली होती. स्थानिकांच्या विनंतीनंतर वनाधिकारी रश्मी मुळगावकर व इतरांनी रविवारी सकाळी लामगाव गावाला भेट देऊन स्थानिकांशी चर्चा करून पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर चर्चेनंतर गावातील जंगलात पिंजरा लावण्याचे ठरले. अखेर वनविभागाचे अधिकारी सायंकाळी पिंजऱ्यासह गावात परतले आणि पिंजरा गावातील जंगलात लावण्यात आला. दरम्यान, स्थानिक देविदास गोवेकर यांनी तातडीने कारवाई केल्याबद्दल वन अधिकाऱ्यांचे गावाच्या वतीने आभार मानले आहेत. या अगोदर मुळगाव आणि धबधबा गावातही बिबट्याचे दर्शन घडले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.