Leopard Attack: शिवोली आगरवाडा येथे बिबट्याचा थरार, विद्यार्थ्यावर हल्ला

Leopard Attack On Student: शिवोली आगरवाडा येथे एका विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१० जुलै) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

हरमल: शिवोली आगरवाडा येथे एका विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१० जुलै) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झालाय. हरमल येथील असफ निकोलस (वय २४ वर्षे) हा युवक गोव्यातील एका नामांकित हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. बुधवारी रात्री तो स्कूटरवरून चोपडेहून आपल्या घरी हरमलला परतत होता. दरम्यान, आगरवाडा भागातील एका चढणीवर असलेल्या हॉटेलजवळ पोहचताच अचानक एका बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला.

घटनास्थळी अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे निकोलस क्षणभर घाबरला, मात्र बिबट्या काही क्षणातच जंगलाच्या दिशेने पसार झाला. हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत निकोलसला मदतीचा हात दिला आणि त्याला सावरत घरी पोहचवण्यासाठी मदत केली.

निकोलसने प्रवासादरम्यान हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्याच्या डोक्याला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. मात्र, हल्ल्यादरम्यान पायाला किरकोळ जखम झाली आहे.

या घटनेनंतर आगरवाडा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याच्या हालचाली दिसून येत होत्या. मात्र, या हल्ला झाल्याने स्थानिक नागरिक आणि विशेषतः दुचाकीस्वारांमध्ये भीती वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com