Sanguem Mining Fire: सांगे येथील BNF खाण प्रकल्पात भीषण आग; Video

Sanguem BNF Mining Fire: काले पंचायत भागातील चानीमळ-कष्टी भागातील खाली झालेल्या चिरेखाणीत औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक बॅरल, इतर प्लास्टिक साहित्य डम्प करण्यात आले होते.

सांगे: चानीमळ-कष्टी, काले-सांगे येथील प्लॅस्टिक कचऱ्याच्या ढिगाऱ्याला शनिवारी (ता.१०) भर दुपारी अचानक आग लागल्याने संपूर्ण लोकवस्तीत धुराचे गडद ढग जमल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविताना त्रास सहन करावे लागले. तरीही अग्निशमन दलाने प्रयत्नांची शिकस्त करून आगीवर नियंत्रण मिळविले.

काले पंचायत भागातील चानीमळ-कष्टी भागातील खाली झालेल्या चिरेखाणीत औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक बॅरल, इतर प्लास्टिक साहित्य डम्प करण्यात आले होते. या डम्प करण्यात येणाऱ्या प्रक्रियेला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध होता. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार लेखी तक्रार देण्यात आली होती; पण पंचायतीने कोणतीही दखल घेतली नाही म्हणून ही घटना घडली असल्याचा आरोप यावेळी महिला तसेच अन्य नागरिकांनी केला.

प्लास्टिक कचऱ्याला आग भडकल्यानंतर दुर्गंधीयुक्त धूर लोकंवस्तीत पसरला असता स्थानिकांनी या घटनेला पंचायत जबाबदार असल्याचे सांगितले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कुडचडे अग्निशमन दलाने दोन बंब एकाच वेळी आणून आग विझविली. यावेळी सांगेचे मामलेदार सिद्धार्थ प्रभू, स्थानिक पंचसदस्य बाळो रेकडो व इतर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com