Video
Heavy Rain in Goa: गोव्यात सलग 2 दिवस पावसाचे थैमान
Rain in Goa: राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्याचा परिणाम ठिकठिकाणी दिसून येत आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्याचा परिणाम ठिकठिकाणी दिसून येत आहे. मडगावमधील गोगोल परिसरात कुडतरकर लँडमार्क येथील कठडा अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी परिसराची पाहणी करून तातडीने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या दुर्घटनेची शक्यता टळली आहे.