Christmas 2024: ख्रिसमसच्या स्वागतासाठी गोवा सज्ज! बाजारपेठा सजल्या; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

Christmas Celebration Goa: बाजारपेठांत सध्या खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. या नाताळाच्या सणाला लागणाऱ्या सर्व वस्तू बाजारामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

Christmas Celebration Goa 2024

बार्देश: गोंयच्या सायबाचे फेस्त साजरे झाल्यावर गोमंतकीयांना वेध लागतात ते नाताळाचे, येत्या २५ डिसेंबरला येसूच्या जन्म सोहळ्याने नाताळाला सुरवात होणार आहे. राज्यातील ख्रिस्ती बांधवांचा हा एक प्रमुख सण आहे, मात्र या सणात गोव्यातील हिंदू, मुस्लिम व अन्य धर्मीय समाजही हिरिरीने सहभागी होतो. ख्रिसमस चार दिवसांवर येऊन ठेपल्याने सध्या घरोघरी तयारीला वेग आला आहे.

बाजारपेठांत सध्या खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. या नाताळाच्या सणाला लागणाऱ्या सर्व वस्तू म्हापसा बाजारामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. व्यापारी वेगवेगळ्या वस्तू घेऊन बसलेले असून त्या खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत.

ख्रिसमसच्या आदल्या रात्री सर्व चर्चमध्ये खास प्रार्थनासभा होते. बहुतेक ख्रिस्त बांधव या प्रार्थनासभेत सहभागी होतात. तसेच घरात ख्रिसमस ट्री, गोठा आदी उभारून सजावट केली जाते. घरातही खास प्रार्थना होते. ख्रिसमस दिवशी घरात खाण्यापिण्याच्या जिन्नसांची रेलचेल असते. कुटुंबीय, आप्त, मित्रमंडळी, हितचिंतक आदींना बोलावून जेवूखाऊ घातले जाते. ख्रिस्ती समाजाबरोबर अन्य धर्मियांसाठीही हा एक आनंदाचा क्षण असतो.

खाद्य पदार्थांना मागणी

या सणासाठी सध्या खरेदी जोरात सुरू आहे. म्हापसा बाजारपेठ सध्या नाताळाला लागणाऱ्या साहित्याने सजली आहे. खाद्य पदार्थांच्या दुकानावर गर्दी दिसत आहे. नाताळात धोदल, करंज्या आदी पदार्थांना खास मागणी असते. हे बहुतांश पदार्थ नारळापासून बनवलेल्या गुळाचा व साखरेचा वापर करून बनवलेले असतात. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने ख्रिस्ती बांधवांनी खरेदीसाठी म्हापसा बाजारपेठेत गर्दी केली होती. हारतुरे, चांदण्या, विजेचे साहित्य आदींना मोठी मागणी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com