Goa Assembly 2024: 'हर घर जल'च्या दाव्यावरुन सरकार विरोधकांकडून धारेवर!
गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. विधानसभेत तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्यांवरुन घेरले. राज्यात एकीकडे पावसाने हाहाकार माजवला असताना दुसरीकडे, राजकीय तापमान देखील वाढत आहे. विरोधकांनी सरकारचा 'हर घर जल'चा दावा खोटा असल्याचे सांगत हल्लाबोल केला. राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची जोडणी देखील झाली नसल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले. आमदार विजय, विरेश आणि फेरेरा यांच्याकडून विधानसभेत संयुक्त लक्षवेधी मांडण्यात आली. या लक्षवेधीच्या माध्यमातून तिघांनीही सरकारला धारेवर धरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.