Goa Assembly 2024: अमली पदार्थांच्या व्यापारात पोलिस-राजकारणी यांचा हातखंडा; सरदेसाईंचा हल्लाबोल
गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील जुगलबंदीसह खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यातील विविध मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी सावंत सरकारवर हल्लाबोल केला. त्यामध्ये मग पावसाळ्यातील कामावरुन ते अमली पदार्थाच्या व्यापारातील पोलिस आणि राजकारणी यांच्यातील संबंधापर्यंत.... गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी तर अमली पदार्थाच्या व्यापारात पोलिस आणि राजकारणी लोक कसे लिंक आहेत याचा पाढाच वाचून दाखवला. आपल्या भाषणातून त्यांनी सावंत सरकारला चिमटे काढत हल्लाबोल केला. राज्यातील वाढत्या अमली पदार्थाच्या व्यापारात पोलिसांचा सहभाग वारंवार दिसून आल्याचेही ते यावेळी म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.