गोव्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. गोमंतकीय मोठ्या भक्तीभावाने गणपतीची आराधना करतायेत. पण दुसरीकडे समुद्रकिनारी विदारक दृश्य पाहायला मिळाले. दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मात्र पीओपीच्या गणेश मूर्ती समुद्रकिनारी आल्या. याच मुद्यावरुन आता गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी एका घणाघाती वक्तव्यात गोव्यात पीओपीच्या गणेशमूर्तींच्या आयातीपासून संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल गोवा सरकारवर जोरदार टीका केली. गणेश विसर्जनानंतर कित्येक ठिकाणी पीओपीच्या मूर्ती समुद्र आणि नदीच्या काठावर येऊन पडल्या आहेत. हे चित्र विदारक असल्याचे त्यांनी म्हटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.