Goa Politics: धाकू मडकईकरांची विजय सरदेसाईं विरोधात तक्रार, 'हे' आहे कारण

Complaint against vijay sardesai: धाकू मडकईकर यांनी फातोर्डा पोलिस स्थानकात सरदेसाई यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ व भारतीय न्याय संहितेच्या ३५२ व ३५३ कलमान्वये एफआयआर नोंद करण्याची मागणीही केली आहे.

सासष्टी: फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सभापती रमेश तवडकर यांच्याबद्दल असंवैधानिक शब्द उच्चारल्याबद्दल सेंट लॉरेन्स चे जिल्हा पंचायत सदस्य व भाजपच्या एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष धाकू मडकईकर यांनी फातोर्डा पोलिस स्थानकात सरदेसाई यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ व भारतीय न्याय संहितेच्या ३५२ व ३५३ कलमान्वये एफआयआर नोंद करण्याची मागणीही केली आहे. या तक्रारीची एक प्रत ‘एसटी’ आयोगालाही पाठवली असल्याचे सांगण्यात आले.

आज मडगावात भाजपच्या एसटी मोर्चातर्फे पत्रकार परिषद घेऊन आमदार सरदेसाई यांचा निषेध करण्यात आला. यावेळी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, उपाध्यक्ष धाकू मडकईकर, जिल्हा पंचायत सदस्य संजना वेळीप, सुरेश केपेकर, तियात्र अकादमीचे अध्यक्ष ॲन्थनी बार्बोझा उपस्थित होते.

सभापती रमेश तवडकर हे एसटी समाजाचे प्रतिनिधित्व करतात व त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे हा एसटी समाजाचा अपमान असल्याचे प्रभाकर गावकर यांनी सांगितले. सरदेसाईंनी एसटी समाजही मूळ गोंयकार आहे व त्यांचा अपमान आम्ही सोसून घेणार नाही, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

एसटी समाजाबद्दल सदैव आदर

एसटी समाजाबद्दल आपल्याला सदैव आदर आहे. ते आमचे मूळ गोंयकार आहेत, त्याबद्दल कुणाचेही दूमत असू नये. सभापती रमेश तवडकर यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. आपण जे बोललो त्यात एसटी समाजाचा किंवा सभापतिपदाचा अनादर करण्याचा मुळीच हेतू नव्हता. एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा मुद्दा आपणच मांडला होता. पण सभापती हे तटस्थ पद आहे. त्यांनी राजकीय पक्षांच्या बैठकीला जाणे ही चूकच होती व ही चूक दाखवून देणे हे आपले कर्तव्य, असे आपण मानतो, अशी प्रतिक्रिया आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com