Protect Rajbid: 'राजबीद’मार्गाला वारसास्‍थळ अधिसूचित करा', इतिहास अभ्‍यासक प्रजल साखरदांडेंची मागणी

Goa Cultural Heritage: ‘राजबीद’ हा रस्‍ता पुराभिलेख खात्‍याने तत्‍काळ ऐतिहासिक वारसास्‍थळ म्‍हणून अधिसूचित करावा, अशी मागणी इतिहास अभ्‍यासक प्रा. प्रजल साखरदांडे यांनी केली.

पणजी: कदंब काळातील जयकेशी या राजाने गोपकपट्टणम ते जुने गोवे दरम्‍यान ११ व्‍या शतकात बांधलेला ‘राजबीद’ हा रस्‍ता पुराभिलेख खात्‍याने तत्‍काळ ऐतिहासिक वारसास्‍थळ म्‍हणून अधिसूचित करावा, अशी मागणी इतिहास अभ्‍यासक प्रा. प्रजल साखरदांडे यांनी केली.

बुधवारी पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते एल्‍विस गोम्‍स त्‍यांच्‍यासोबत उपस्‍थित होते. गोव्‍यावर अनेक वर्षे कदंब राजांनी राज्‍य केले. त्‍यातील जयकेशी या राजाने आपल्‍या राज्‍याची राजधानी चांदर येथून जुने गोवेला वळवत असताना गोपकपट्टणम ते जुने गोवे या दरम्‍यान जो नऊ किमीचा रस्‍ता बांधला. त्‍या रस्‍त्‍याला ‘राजबीद’ असे नाव दिले.

जुने गोवेतील चर्च परिसर ऐतिहासिक वारसास्‍थळ असल्‍याने या भागात कोणत्‍याही प्रकारचे बेकायदा बांधकाम होणार नाही, याची सरकारने काळजी घेणे आणि ‘राजबीद’ला ऐतिहासिक वारसास्‍थळ जाहीर करणे गरजेचे आहे, असे गोम्‍स यांनी स्‍पष्‍ट केले.

बिल्डरांचे आक्रमण

हा इतिहास कुणाला माहीत नसल्‍याने आणि सरकारने आतापर्यंत हा रस्‍ता ऐतिहासिक वारसास्‍थळ म्‍हणून जाहीर झालेला नाही. त्‍यामुळे बिल्‍डरलॉबी या रस्‍त्‍यावर अतिक्रमण करीत आहे. याचा गांभीर्याने विचार करून पुराभिलेख खात्‍याने तत्‍काळ ‘राजबीद’ हा रस्‍ता ऐतिहासिक वारसास्‍थळ म्‍हणून अधिसूचित करणे गरजेचे आहे, असेही साखरदांडे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com