Court Roof Issue: जिल्हा सत्र न्यायालयाचे पत्रे उखडल्याने एमव्हीआरवर कठोर कारवाईची मागणी

Court Roof Issue: जिल्हा सत्र न्यायालयाचे पत्रे उखडल्याने एमव्हीआरवर कठोर कारवाईची मागणीही विरोधकांनी विधानसभेत केली.

राज्यात सध्या पावसानं धूमशान घातलं आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. सतत पडत असणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच आज मेरशीतील नव्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटनापूर्वीच पत्रे उडाल्याने विधानसभा अधिवेशानत मोठा हंगामा झाला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावरच घेतले. या सत्र न्यायालयाच्या इमारतीसाठी 120 कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याचा घणाघात विरोधकांनी केला. राज्यात भ्रष्ट सरकारकडून भ्रष्टाचाराचे आणखी एक स्मारक असे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी सरकारवर ताशेरे ओढले. जिल्हा सत्र न्यायालयाचे पत्रे उखडल्याने एमव्हीआरवर कठोर कारवाईची मागणीही विरोधकांनी विधानसभेत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com