Congress on Vishwajit: ...आता मंत्री विश्वजीतना कॉंग्रेसचे आव्हान!
गोवा विधानसभेचे अधिवेशन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. तत्पूर्वी, राज्यातील राजकारणात वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडतायेत. काही दिवसांपूर्वी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री विश्वजित राणे यांनी काँग्रेस नेत्यांनीही टीसीपी खात्याची मदत घेतल्याचा आरोप केला होता. आता त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी चांगलाच समाचर घेतला. विश्वजित राणे यांनी याप्रकरणासंबंधी विधानसभेत अशा काँग्रेस नेत्यांची नावे जाहीर करावीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह काँग्रेस आमदारांनी राणेंना खुलं आव्हान दिलं. आता, याप्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण कोणत्या प्रकारे बदलतेय हे पाहावं लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.