Video
Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची 'आप' कडून मागणी
Amit Palekar: आप नेते अमित पालेकर यांनी मंत्र्यांसह सत्तेतील आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याचीही मागणी केली.
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून राज्यात अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. पूजा नाईक, दीपाश्री सावंत गावस, दिव्या यादव या महिला सध्या चर्चेच्या विषय आहेत. या तिन्ही महिलांनी नोकरी आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घातला. पूजा नाईक प्रकरणात तर हद्द म्हणजे सरकारी अधिकारी सामील असल्याचे समोर आले आहे. याच पाश्वभूमीवर विरोधकही आक्रमक झाले आहेत. आम आदमी पक्षाने आता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली. आप नेते अमित पालेकर यांनी मंत्र्यांसह सत्तेतील आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याचीही मागणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.