Calf Rescued: पडक्या विहिरीत पडले वासरु, अग्निशमनच्या जवानांनी केली सुखरूप सुटका; वाठादेव-डिचोलीतील घटना, Video

Calf Rescued at Vathadev Bicholim: वाठादेव येथील ज्योतिबानगर परिसरातील एका पडक्या आणि धोकादायक विहिरीत (शनिवारी) सकाळी एक वासरू पडण्याची घटना घडली.

डिचोली: वाठादेव-डिचोली येथील एका जमिनीसमान असलेल्या पडक्या विहिरीत पडलेल्या वासराची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.

वाठादेव येथील ज्योतिबानगर परिसरातील एका पडक्या आणि धोकादायक विहिरीत (शनिवारी) सकाळी एक वासरू पडण्याची घटना घडली. स्थानिक पंचसदस्य योगेश पेडणेकर यांनी यासंबंधी डिचोली अग्निशमन दलासह प्राणिमित्र अमृतसिंग यांना या घटनेची कल्पना दिली. अग्निशमन दलाचे अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडींग फायर फायटर अर्जुन धावस्कर यांच्या नेतृत्वाखाली जवानांसह अमृतसिंग यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी महत्प्रयासाने सुमारे १२ मीटर खोल विहिरीत अडकलेल्या वासराची सुखरूप सुटका केली. वासराला विहिरीबाहेर काढताच, त्याने धूम ठोकली.

धोकादायक विहीर बुजवा

वाठादेव येथे लोकवस्तीजवळ ही पडकी विहीर धोकादायक अवस्थेत आहे. ही विहीर जमिनीसमान असून, या विहिरीचा सहजासहजी अंदाज येत नाही. या विहिरीत एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वी स्थानिक पंचायतीने ती बुजवावी, अशी मागणी होत आहे. प्राणिमित्र अमृत सिंग यांनीही तशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com