Bhutani Project: भूतानी प्रकल्पाविरोधात सांकवाळवासीयांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

Protest Against Bhutani Project: गोव्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या भूतानी प्रकल्पाविरोधातील सांकवाळवासीयांचे आंदोलन आक्रमक रुप धारण करु लागले आहे.

गोव्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या भूतानी प्रकल्पाविरोधातील सांकवाळवासीयांचे आंदोलन आक्रमक रुप धारण करु लागले आहे. भूतानी प्रकल्प हा बेकायदेशीर असून त्याला देण्यात आलेली परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी आता सांकवाळवासीयांकडून करण्यात आली आहे. स्थानिकांनी आज (19 ऑक्टोबर) आंदोलन करत भूतानी प्रकल्पाला विरोध केला. भूतानी प्रकल्पाला देण्यात परवानगी जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमचा विरोध सुरुच राहील असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. एवढंच नाहीतर स्थानिकांच्या साथीने सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com