Urfi Javed: उर्फी जावेद या नावाला आता परिचयाची गरज नाही. तिचा ओंगळवाणा अभिनय, विचित्र कपडे आणि जगावेगळा तिचा अॅटिट्युड आता सगळ्यांना माहिती पडला आहे. उर्फी जावेद तिच्या बोल्ड आणि इंटिमेट स्टाईलच्या कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. यातूनच अनेकवेळा तिच्यावर टीका केली जाते. उर्फी जावेदचे कपडे पाहून अनेकवेळा तिचे कपडे कोण डिझायन करते आणि मुळात ती अशी कपडे का घालते असा प्रश्न पडतो. तसेच, यावरून तिला तिचे आई-वडिल काहीच का बोलत नाहीत असाही प्रश्न पडतो. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
कोण डिझायन करते उर्फी जावेदचे कपडे?
उर्फी जावेदचे कपडे डिझायनर श्वेता श्रीवास्तव डिझाईन करते. उर्फी आणि श्वेता एकमेकांना 15 वर्षांपासून ओळखत आहेत. उर्फी खूप दिवसांपासून डिझायनरच्या शोधात होती. अखेर श्वेता श्रीवास्तवच तिचे कपडे डिझाइन करायला लागली. दरम्यान, श्वेता श्रीवास्तवला याबाबत विचारण्यात आले तेव्हा, 'उर्फीने कोणता ड्रेस घालायचा या सर्व कल्पना उर्फी जावेदच्याच आहेत. मी फक्त डिझाइन करते.' असे उत्तर तिने दिले होते.
उर्फी जावेदचे कपडे शिवण्यासाठी खूप वेळ लागतो. असे श्वेता श्रीवास्तव सांगितात. श्वेता श्रीवास्तव फक्त उर्फी जावेदसाठी काम करते, इंडस्ट्रीतील इतर कोणत्याही स्टार किंवा सेलिब्रिटीसाठी ती डिझाइन करत नाही.
बिल्डिंगमधील लोक काय म्हणतात?
'माझ्या बिल्डिंगमधील बहुतेक लोकांना मी तिथे राहते हे माहीत देखील नाही. मुंबईत शेजारच्या किंवा पुढच्या घरात कोण राहतंय हेही कळत नाही. होय. मी रस्त्यावर जातो तेव्हा लोक मला न विचारता व्हिडिओ बनवायला लागतात. मात्र यासाठी त्यांनी माझ्याकडून परवानगी घ्यावी. तसे, मी लोकांसोबत सेल्फी घेण्यासही नकार देत नाही. असे उर्फी म्हणाली एका मुलाखतीत म्हणाली होती.
नातेवाईक विचारतात उर्फीसाठी का काम करतेस?
श्वेता श्रीवास्तवला तू उर्फीसाठी का काम करता असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'मित्र आणि नातेवाईक म्हणतात तू उर्फीसाठी का काम करत आहेस. पण मी त्यांना सांगतो की हा तुमचा स्वतःचा दृष्टिकोन आहे. मला काही फरक पडत नाही. मला जे आवडते तेच मी करत आहे. असे उत्तर श्वेता श्रीवास्तवने दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.