Uorfi Javed- Chitra Wagh : चित्रा वाघ यांच्याविरोधात ऊर्फीने दाखल केली तक्रार...दोघींच्या वादाला आता नवे वळण...

अभिनेत्री ऊर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद काही थांबताना दिसत नाही. या वादाने आता वेगळे वळण घेतले आहे.
Uorfi Javed
Chitra Wagh
Uorfi Javed Chitra WaghDainik Gomantak

काही दिवसांपुर्वी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात अश्लीलता पसरवल्याप्रकरणी पोलिसात तक्रार केली होती. 

त्यानंतर उर्फीनेही ट्विटरवर चित्रा वाघ यांच्यासोबत उघडपणे पंगा घेतला. आता उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.

बिगबॉस ओटीटी फेम उर्फी जावेदने महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि भाजप नेत्या चित्रा किशोर वाघ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह कपडे परिधान केल्याबद्दल भाजपच्या नेत्या चित्रा यांनी यापूर्वी उर्फी जावेदला फटकारले होते.

आता उर्फीने चित्रा वाघ यांच्याविरोधात धमकी दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.उर्फी जावेदचे वकील नितीन सातपुते यांनी याबाबत माहिती दिली. 

उर्फी जावेदचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी भाजपच्या नेत्या चित्रा किशोर वाघ यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 153(ए)(बी), 504, 506, 506(ii) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अंतर्गत तक्रार CRPC च्या कलम 149 आणि 107 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची विनंती केली गेली आहे. मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेदला धमकावल्याबद्दलही गुन्हा दाखल केला आहे.

Uorfi Javed
Chitra Wagh
Miss Universe 2021 Winner: 'हरनाजचा' मुकुट भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

उर्फी जावेदच्या वकिलांच्या सांगण्यानुसार असेही सांगितले की त्यांनी तक्रारीची प्रत महिला आयोगाला देखील पाठवली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या श्रीमती रुपाली चाकणकर यांना त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची विनंती केली. 

या प्रकरणी मीडियाने उर्फी जावेदशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तिने या विषयावर बोलण्यास नकार दिला.

गेले काही दिवस हा वाद वेगवेगळी वळणं घेत इथंवर पोचला आहे. चित्रा वाघ आणि ऊर्फी जावेद यांचे ट्विट्टर वॉर गेले काही दिवस सुरू आहे. या वादाचा शेवट काही होताना दिसत नव्हता.

चित्रा वाघ पत्रकार परिषद घेऊन आपली भूमीका मांडायच्या तर ऊर्फी तिच्या स्टाईलने ट्विट्टरवर त्यांना उत्तर द्यायची. हा सगळा एक मनोरंजक खेळ झाला होता. आता पुन्हा एकदा या वादाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com