Sunny Deol : सनी देओललाच जेव्हा एकजण म्हणतो "तुम्ही सनी सारखे दिसता"! मजेदार व्हिडीओ व्हायरल

अभिनेता सनी देओलने एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे.
Sunny Deol
Sunny DeolDainik Gomantak

अभिनेता सनी देओलला कुठल्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. कित्येक चित्रपटातुन सनी देओलने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ;पण बऱ्याचदा मोठ्या पडद्यावर बघितलेल्या कलाकाराला प्रत्यक्षात बघितल्यानंतर कुठल्याही सामान्य माणसाला ते पटकन ओळखता येत नाही.

सनी देओलने एका व्यक्तीसोबतच्या संवादाचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला ओळखू शकत नाही. त्याने सनीला सांगितले की, तो अभिनेता सनी देओलसारखा दिसत होता.सनी देओलने त्याचा पुढील चित्रपट गदर 2 च्या शूटिंगदरम्यान अहमदनगरमधील ग्रामीण रस्त्यांवर प्रवास करताना झालेल्या मजेदार भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे .

तो ज्या माणसाला भेटला, तो बैलगाडीवर स्वार झालेला माणूस, त्याने कल्पनाही केली नसेल की त्याला सनी देओल भेटेल. बॉलीवूड चा हा अभिनेता असा रस्त्यावर भेटण्याची कल्पना त्याने केली नसेल हे नक्की . त्याने सनीला स्पष्टपणे सांगितले की तो अभिनेता सनी देओलसारखा दिसतो. 

एक बैलगाडी व्हिडिओत दिसण्यापासून या क्लिपची सुरूवात होते. हा व्हिडीओ सनीसोबत गाडीत बसलेल्या व्यक्तीने शूट केला आहे. जेव्हा शेतकऱ्याला विचारलं जातं की हे काय आहे तेव्हा तो म्हणाला की तो जनावरांसाठी ज्वारीचा भुसा घेऊन जात होता. पुढे, सनी देओल समोर आला, त्याच्या आणि त्याने त्या व्यक्तीशी शेकहॅंड केले.

Sunny Deol
Tunisha Sharma Suicide case: शीजान अजुन अडकणार? तुनिषाचा फोन पोलिसांकडुन अनलॉक..

त्यानंतर सनी आणि बैलगाडी चालवणाऱ्या शेतकऱ्याचं बोलणं झालं. सनीने त्या शेतकऱ्याला विचारले की तुम्ही कोठे जात आहे, आणि त्या शेतकऱ्याला उलट विचारलं , "तुम्ही सनी देओल सारखे दिसता, शेतकऱ्याच्या या वाक्यावर सनी देओलला खूपच गंमत वाटली.

" "होय, मी सनी देओलच आहे" असे म्हणत सनी हसला. तो माणूस आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, "अरे बाप रे ," त्याने पुन्हा एकदा सनीशी हस्तांदोलन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com