Suhani Bhatnagar Passed Away: दु:खद बातमी! दंगल गर्ल बबीताचे 19 व्या वर्षी निधन

Suhani Bhatnagar Passed Away: शनिवारी फरिदाबादमध्ये तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
Child Actress Suhani Bhatnagar Passed Away
Child Actress Suhani Bhatnagar Passed AwayDainik Gomantak
Published on
Updated on

Child Actress Suhani Bhatnagar Passed Away

आमिर खानच्या 'दंगल' या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटात लहानपणीच्या बबीताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहानी भाटनगरचे अवघ्या 19 व्या वर्षी निधन झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून एम्स हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या निधनानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, सुहानीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारात ती घेत असलेल्या औषधांचा तिच्या शरिरावर साइड-इफेक्ट झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे तिच्या शरिरात फ्लूइड अॅक्युमिलेशन झाले व यामुळेचे तिचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे.

सुहानीने सुपरस्टार आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या दंगल या चित्रपटात छोट्या बबीताची भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून कौतुक केले होते.

चित्रपटाच्या दरम्यान आमिर खान, दिग्दर्शक नितेश तिवारी, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, शंकर महादेवन यांच्यासोबतचे फोटो तिने तिच्या इंटाग्राम अकाऊंट शेअर केले होते.

शनिवारी फरिदाबादमध्ये सुहानीवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com