Sushant Singh Rajput: सुशांत सिंग राजपूतचा 2020 मध्ये मृत्यू झाला. डिप्रेशनमुळे त्याने आत्महत्या केलीअसल्याचे सांगितले जात आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याच्या नावावरुन राजकारण केले. त्याच्या मृत्यूच्या 2 वर्षानंतरही हे चक्र सुरुच आहे.
दरम्यान, फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सुशांतच्या नावाचे टी-शर्ट ट्रोल झाल्यामुळे चाहत्यांचा संताप होत आहे. तुम्ही म्हणाल की, हे टी-शर्ट आहेत, त्यावर एवढा राग का आणि सुशांतचा काय संबंध? मुद्दा असा आहे की, हा सामान्य टी-शर्ट नाही. टी-शर्टवर सुशांत सिंग राजपूतचा फोटो छापण्यात आला आहे. याहून धक्कादायक म्हणजे त्यावर लिहिलेले कोटेशन. सुशांतचा फोटो असलेल्या टी-शर्टवर कॅप्शन लिहिले, 'नैराश्य म्हणजे बुडण्यासारखे आहे.' हा टी-शर्ट फ्लिपकार्टवर 179 रुपयांच्या डिस्काउंटनंतर विकला जात आहे. त्याची किंमत 1099 सांगितली जात आहे.
दुसरीकडे, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा फोटो (Photo) असलेला हा टी-शर्ट विकल्याबद्दल फ्लिपकार्टवर सुशांतचे चाहते संतापले आहेत. ट्विटरवर (Twitter) फ्लिपकार्टवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. सुशांतचे नाव डिप्रेशनशी जोडले गेल्याचे पाहून चाहते चांगलेच संतापले. चाहते म्हणत आहेत की, सुशांतची हत्या नैराश्याने नाही तर बॉलीवूडमधील (Bollywood) माफियांनी केली आहे. एका चाहत्याने फ्लिपकार्टला दिशाभूल करणारा टी-शर्ट विकल्याबद्दल नोटीस पाठवण्यास सांगितले आहे.
तसेच, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत यांचे निधन झाले. वयाच्या 34 व्या वर्षी सुशांतने जगाचा निरोप घेतला. सुशांत त्याच्या मुंबईतील (Mumbai) फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. परंतु सुशांतच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. अनेक एजन्सींनी त्यासंबंधी चौकशी केली आहे. मात्र अद्याप कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.