Salaar Movie Release: प्रभासच्या सालारची उत्सुकता वाढली! मध्यरात्रीच होणार प्रदर्शित; त्याआधीच केली करोडोंची कमाई

Salaar Movie Release: मात्र यावेळी त्याची टक्कर शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल स्टारर 'डंकी' चित्रपटाशी होणार आहे.
Salaar
Salaar Dainik Gomantak

Salaar Movie Release: दाक्षिणात्य अभिनेता प्रभास लवकरच सालार चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

मात्र यावेळी त्याची टक्कर शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल स्टारर 'डंकी' चित्रपटाशी होणार आहे.

शाहरुखचा डंकी २१ डिसेंबरलाच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत प्रभासच्या चाहत्यांची प्रतीक्षा कमी करण्यासाठी तेलंगणा सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

चित्रपट सालार चित्रपटाच्या ओपनिंग वीकेंडला पहाटे 1 आणि 4 वाजता दाखवला जाईल. या योजनेला सरकारने हिरवा कंदील दिला आहे. तेलंगणा सरकारने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये त्याने चित्रपटाच्या पहाटे 1 च्या शोला मान्यता दिली आहे.

Salaar
सामाजिक परिवर्तनाची हाक देणाऱ्या कोह चित्रपटातून यशपाल शर्मा करणार एन्ट्री

मात्र, परिस्थिती लक्षात घेता सरकारने या चित्रपटाच्या लवकर प्रदर्शनाला फक्त परवानगीच दिली नाही तर निर्मात्यांना मल्टिप्लेक्समधील तिकिटांच्या किंमती 100 रुपयांपेक्षा जास्त वाढवण्यास सांगण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की तेलंगणा राज्यात 22 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता 'सालार' चित्रपटाच्या 6 शोसाठी परवानगी दिली जात आहे. शिवाय त्याचे दरही वाढत आहेत. सिंगल स्क्रीनमध्ये 65 रुपये आणि मल्टिप्लेक्समध्ये 100 रुपयांची वाढ होणार आहे.

तेलंगणा सरकारने 22 डिसेंबरला काही चित्रपटगृहांमध्ये पहाटे 1 वाजताचा शो दाखवण्यास मान्यता दिली आहे. समोर आलेल्या माहीतीनुसार या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 577406 तिकिटे विकून 12.67 कोटींची कमाई केली आहे.

अशा परिस्थितीत रिलीज होण्यापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमधून चांगली कमाई केली आहे. आणि येत्या काळात हा आकडा वाढणार आहे.आता शाहरुखचा डंकी आणि प्रभासचा सालार यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com