Ranbir Kapoor and Vicky Kaushal: विकीच्या 'गोविंदा मेरा नाम' मध्ये रणबीर भाव खाऊन गेला?

नुकत्याच रिलीज झालेल्या 'गोविंदा मेरा नाम' या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर चांगलाच भाव खाऊन गेल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
Ranbir Kapoor
Ranbir Kapoor Dainik Gomantak

अभिनेता विकी कौशलचा 'गोविंदा मेरा नाम' हा चित्रपट काल (17 डिसेंबर) रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला असुन त्यात रणबीर कपूर स्पेशल अपिअरन्समध्ये दिसला आहे. प्रेक्षक या रोलसाठी रणबीरचं कौतुक करत आहेत.

रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र यंदाचा सगळ्यात मोठा हीट ठरला आहे. पण प्रेक्षकांनी रणबीरला याही चित्रपटात दाद दिली आहे.

विकी कौशल आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमीका असलेला 'गोविंदा मेरा नाम' शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झाली. ही फिल्म डिज्ने हॉटस्टारवर प्रेक्षकांना बघायला मिळु शकते.

एक विनोदी चित्रपट म्हणुन प्रेक्षकांनी हा चित्रपट बघायला सुरुवात केली आणि अचानक त्यांना रणबीर कपूर दिसताच एक सुखद धक्का बसला. या चित्रपटात विकी आणि कियारा कोरियोग्राफर बनण्यासाठी संघर्ष करत असतात. रणबीर कपूर आणि कियारा एका गाण्यावर डान्स करतानाही आपल्याला या सिनेमात दिसतात, या गाण्याची कोरियाग्राफी आपली आहे अशी थाप विकी आणि कियारा रणबीरला मारतात पण इतक्यात तिथे गणेशाचार्य येतात असा एक सिन चित्रपटात आहे.

Ranbir Kapoor
Actress Renuka Shahane: रेणुका शहाणेची खंत, या कारणामुळे ऑडिशन्स मध्ये होतेय रिजेक्ट

चित्रपटात अचानक रणबीर कपूर समोर दिसल्याने प्रेक्षक भलतेच खुश झाले आहेत. आता रणबीर कपूर आगामी तु झुठी मै मक्कार चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. शमशेरा हा रणबीरचा चित्रपट चालला नसला तरी ब्रह्मास्त्रमध्ये ही उणीव त्याने भरुन काढली आहे. आता पुढच्या चित्रपटात रणबीर कोणत्या भुमिकेत दिसतो याची रणबीरच्या फॅन्सना उत्सुकता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com